
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : – शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्या ज्ञानात भर पडावी,थोर पुरुषांचे विचार आत्मसात व्हावे व या विचारांनी उज्वल पिढी घडावी त्याचबरोबर थोर विचारांचा ठेवा डिजिटल युगामध्ये जतन राहावा या उद्दैशाने सार्वजनिक वाचनालय कुंभारी या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आणि गुरुवर्य तुकाराम बाबा विद्यालयातील विद्यार्थी – विद्यार्थीनींना स्वतंत्र वेगवेगळे प्रकारचे ग्रंथ वाचनास देऊन सामुहिक ग्रंथ प्रदर्शनाचा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी कचरू पाटिल कोळपे, पत्रकार माणिकराव उगले,पत्रकार राजेंद्रजी तासकर, राजेंद्र रामचंद्र राजगुरू,जिल्हा परिषद कुंभारी शाळेचे मुख्याध्यापक दरेकर सर, झाडे सर ,जगदाळे सर,बाविस्कर सर, ताजने सर, काळे सर,वाचनालयाचे अध्यक्ष रमण गायकवाड, ग्रंथपाल यशवंत गायकवाड त्याचबरोबर वाचक वर्ग माधव सोनवणे,भारत पगारे,दीपक वाघ,कोळपकर,भाऊसाहेब पवार , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व गुरुवर्य तुकाराम बाबा विद्यालयाचे विद्यार्थी -विद्यार्थीनी, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

उपक्रमाचे प्रास्तविक वाचनालयाचे अध्यक्ष रमण गायकवाड यांनी केले. तर कचरू पाटील कोळपे विद्यार्थ्यांना संबोधित करतांना म्हणाले कि, ग्रंथ ही दुधारी धार आहे.ग्रंथ वाचनाने बौधिक कौशल्यात वाढ होण्यास मदत होते व त्याच बौघिक कौशल्याच्या जोरावर मनुष्य प्राणी आपल्या जीवन प्रवासात येणाऱ्या संकटावर मात करतं सफल होतो. याचबरोबर पत्रकार माणिकराव उगले बोलतांना म्हणाले कि,”वाचाल तर वाचा ल” जीवनात वाचनाची गोडी असणे आवश्यक आहे.वाचन केल्याने विद्यार्थ्यामध्ये धाडसी प्रवृत्ती निर्माण होते. तसेच राजेंद्र राजगुरू,जगदाळे सर आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले.

आलेल्या मान्यवरांना वाचनालयाच्या वतीने शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.तर शेवटी उपस्थितांचे आभार ग्रंथपाल यशवंत गायकवाड यांनी मानले.