Homeकोपरगावप्राथमिक विद्यालयाच्या या विद्यार्थ्याने गणित व विज्ञान प्रदर्शनात दुसरा क्रमांक मिळविला

प्राथमिक विद्यालयाच्या या विद्यार्थ्याने गणित व विज्ञान प्रदर्शनात दुसरा क्रमांक मिळविला

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : – कोपरगाव तालुका गणित व विज्ञान 52व्या प्रदर्शनाचे (दि ७ व ८) जानेवारी दरम्यान संवत्सर येथे आयोजन करण्यात आले होते. आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न झाले.

श्री छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय गौतमनगर सुरेगाव या विद्यालयाने गणित व विज्ञान प्रदर्शनामध्ये आपले उपकरणे प्रदर्शित केले होते.यामध्ये १ली ते ५ वी विज्ञान गटात द्वितीय क्रमांक-आयुष गणेश बत्तासे याने मिळविला आहे.

श्री छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय गौतमनगर सुरेगाव (गुरूकुल) या विद्यार्थ्यांने ग्रास हार्वेस्टिंग मॉडेल हे उपकरण सादर करत या गटात तालुक्यात दुसरा क्रमांक पटकावला या गणित विज्ञान प्रदर्शनामध्ये इ .१ली ते ५वी इ ६वी ते ८वी.व इ ९वी ते १२वी.असे तीन गट निहाय तब्बल २०० उपकरणे ठेवण्यात आले होते.

जिल्हा परिषद सदस्य श्री राजेश आबा परजणे यांच्या प्रमुख उपस्थितीत गटशिक्षण अधिकारी शबाना शेख, गटविकास अधिकारी श्री संदीप दळवी, विज्ञान अध्यापकाचे अध्यक्ष श्री योगेश सावळा, उपाध्यक्ष श्री रमेश हिंगे तसेच मार्गदर्शक मुख्याध्यापक श्री आर.आर.पाचोरे,श्री के.व्ही.वसावे श्री जगताप सर यांच्या हस्ते आयुष बत्तासे याचा प्रमाणपत्र व विजयी करंडक देऊन सन्मान करण्यात आला.

सर्व सहभागी विद्यार्थांचे तसेच आयुष बत्तासे याच्या यशाबद्दल माजी. आमदार.मा. श्री.अशोकराव काळे, रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अध्यक्ष आमदार.मा.श्री.आशुतोष काळे.तसेच,स्थानिक स्कुल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती, अध्यक्ष- सदस्य तसेच सर्व पालकांनी कौतुक करत मार्गदर्शक मुख्याध्यापक श्री. आर. आर.पाचोरे,श्री. जे.आर.बैरागी, श्री. के.व्ही.वसावे,श्री जगताप सर, श्री. ए.जी.भगुरे,श्री.जे.यु.खंबायत, जेष्ठ शिक्षक श्री.आर.के.शिंदे, श्री. एस.के.थोरात, श्रीमती.एस.एस. राऊत, कुर्हाडे मॅडम यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपस्थिती व्याख्याते अमोल चिने,विस्तार अधिकारी,शेवंता पुजारी, केंद्रप्रमुख,भारती शेळके, विलास भांड, बाबाजी इराळे, बाबासाहेब महानुभव, रावसाहेब लांडे, तोरवणे साहेब, दहिफळे सर, साबळे सर ,दिघे सर, मुख्याध्यापक देशमुख सर,पाचोरे सर, मोरे सर व त्यांचा संपूर्ण स्टाफ , गणित व विज्ञान अध्यापक संघाचे समितीचे सदस्य,पवार सर,गोसावी सर, बोडखे सर,गायकवाड सर,हिंगे सर,सलामे सर,सचिन कडू सर,वडवी डी. एम, गायकवाड सर, दिलीपराव बोरणारे, गोवर्धन परजणे, सामाजिक कार्यकर्ते संजयराव काळे, शालेय व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष मधुकर साबळे, सरपंच सुलोचना ढेपले, उपसरपंच विवेक परजणे,गटविकास अधिकारी संदीप दळवी,कृषी अधिकारी सचिन कोष्टी, पंडितराव वाघीरे, सर्व गटविस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, सुरेश वाबळे सर,मुख्याध्यापक सर्व शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमास उपस्थितांचे आभार विज्ञान अध्यापक संघाचे प्रमुख योगेश सावळा यांनी मांनले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!