Homeकोपरगावआजचे शालेय विद्यार्थी भविष्यातील लेखक बनतील -सौ.ऐश्वर्याताई संजय सातभाई

आजचे शालेय विद्यार्थी भविष्यातील लेखक बनतील -सौ.ऐश्वर्याताई संजय सातभाई

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव – आज शालेय शिक्षण घेत असलेली नवीन पिढीला वाचनाची गोडी निर्माण झाली आहे,शिक्षक विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करुन चांगले नागरिक,साहित्यिक आणि उच्च पदावर नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे,आज पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना व्यासपीठावर येऊन बोलण्याची संधी शब्दगंध साहित्यिक परिषदेने ऊपलब्ध करून दिली आणि विद्यार्थांनी ती पर्वणी योग्य पद्धतीने साधली असे विचार शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सौ ऐश्वर्याताई संजय सातभाई यांनी व्यक्त केले.

शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य कोपरगाव शाखेच्यावतीने व स्व र.म.परीख हिंदी मराठी ग्रंथालय वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन संकल्प महाराष्ट्राचा अभियानांतर्गत ग्रंथ प्रदर्शन,कविता वाचन,लेखक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.समारंभाच्या अध्यक्षस्थानी सौ. ऐश्वर्याताई संजय सातभाई होत्या.स्वागत व प्रास्ताविक कवी प्रमोद येवले यांनी केले. सल्लागार सौ.वंदनाताई चिकटे यांनी वाचन संस्काराला अनुसरून मार्गदर्शन केले.सदस्या सौ शैलजाताई रोहोम यांनी मकर संक्रांतीच्या संदर्भात कविता वाचन केले.

समारंभासाठी सचिव स्वातीताई मुळे,एड.शितल देशमुख,ग्रंथपाल योगेश कोळगे, कवयित्री शिक्षिका सौ सुनिता इंगळे आदी उपस्थित होते.या प्रसंगी मुलांनी कविता गाणी सादर केली.

शब्दगंध साहित्यिक परिषद कोपरगाव शाखेच्या वतीने यापुढेही नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन प्रसिद्धी प्रमुख हेमचंद्र भवर यांनी करून अहिल्यानगर येथील ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या साहित्य संमेलनात तालुक्यातील साहित्यिकांना सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे सांगितले. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी ग्रंथ उत्सवात सहभाग घेऊन ग्रंथ बघण्याचा आनंद घेतला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!