Homeकोपरगावकोपरगाव तालुक्यातील सहकारी पतसंस्थांचे ७०० प्रतिनिधी उपस्थित राहणार - राजेंद्र कोळपे,अध्यक्ष

कोपरगाव तालुक्यातील सहकारी पतसंस्थांचे ७०० प्रतिनिधी उपस्थित राहणार – राजेंद्र कोळपे,अध्यक्ष

युनो ने घोषित केलेले २०२५ हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष जगात विविध कार्यक्रम व उपक्रमांच्या माध्यमातून साजरे होत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन ही शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषद १२ देशातील आणि ३ राज्यातील सहकारी पतसंस्था प्रतिनिधींच्या उपस्थितीत सहकारात होत असलेल्या विविध बदलांचे आदान प्रदान करून उत्साहात संपन्न होणार आहे.राज्यातून सहकारी पतसंस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून कोपरगाव तालुक्यातील सहकारी पतसंस्थांवर अधिक जबाबदारी असल्यामुळे त्यांनी देखील या परिषदेत मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा – काका कोयटे,अध्यक्ष

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : अहिल्यानगर जिल्ह्याला सहकाराचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्याला सहकाराची मोठी परंपरा असून आज ही सहकारातील राज्याचे व देशाचे प्रतिनिधित्व करणारे व्यक्तिमत्व काका कोयटे यांच्या रूपाने कोपरगाव तालुक्याला लाभले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आयोजित आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेला कोपरगाव तालुक्यातील सहकारी पतसंस्थांच्या प्रतिनिधींचा सहभाग महत्वपूर्ण असल्यामुळे तालुक्यातील सहकारी पतसंस्थांचे ७०० पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणारअसल्याचा विश्वास कोपरगाव तालुका नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष राजेंद्र कोळपे यांनी व्यक्त केला.

आंतरराष्ट्रीय सहकार परिषद २०२५ पूर्वतयारीसाठी कोपरगाव तालुक्यातील सहकारी पतसंस्थांच्या प्रतिनिधींची बैठक समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या समता सहकार सभागृहात महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. त्या वेळी बोलत होते.

प्रसंगी समता नागरी सहकारी पतसंस्थेने १ हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे आणि सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्या उपाध्यक्ष पदी कोपरगाव तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र कोळपे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

कोपरगाव जवळ असणाऱ्या शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषद संपन्न होणार असल्यामुळे कोपरगाव तालुक्यातील सहकारी पतसंस्थांसाठी अभिमानाचा विषय आहे. महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था चळवळ भक्कम व सक्षम बनविण्यासाठी राज्यभर सहकारी पतसंस्थांच्या भेटी गाठी घेऊन त्यांचे प्रश्न राज्य व केंद्र सरकारकडे मांडत असतात. त्यांनी सहकारी पतसंस्था चळवळ मजबूत बनविल्यामुळे सर्वसामान्यांचा पतसंस्था चळवळीकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक बनला आहे. त्यामुळे काका कोयटे आमच्याकडे जी जबाबदारी देतील,ती आम्ही पार पाडून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्था चेअरमन नितीन औताडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.

या वेळी कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरी, ग्रामीण सहकारी व पगारदार पतसंस्थांनी चे सर्व संचालक, पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कोपरगाव तालुका नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन जेष्ठ संचालक राजेंद्र देशमुख यांनी केले.उपस्थितांचे आभार कोपरगाव तालुका पतसंस्था फेडरेशन उपाध्यक्ष ज्ञानदेव मांजरे यांनी मानले.


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!