Homeकोपरगाववै.ह.भ.प.सौ. वृंदावनीताई आप्पासाहेब गुरसळ यांचे प्रथम पूण्यस्मरण विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरे !!

वै.ह.भ.प.सौ. वृंदावनीताई आप्पासाहेब गुरसळ यांचे प्रथम पूण्यस्मरण विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरे !!

संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव तालुक्यातील दक्षिणेस गोदावरी नदीतीरी वसलेल्या छोटयाशा डाऊच खु॥गावामध्ये आप्पासाहेब व्दारकु गुरसळ यांचे सोबत वृंदावनीताई यांनी विवाहबंधनाची पवित्र अशी रेशीम गाठ बांधुन शेतकरी कुटुंबात पदार्पण केले होते.
शेतकरी कुटुंब जरूर होते परंतु परिस्थिती जेमतेम असल्याने सुरुवातीपासूनच खडतर परिश्रम करून आपल्या पतीबरोबर खांदयाला खांदा लावून संसार प्रपंचाचा गाडा मोठया आनंदाने व उत्साहाने ओढत असतांनाच त्यांना किशोर, प्रविण, प्रशांत, प्रमोद नावाची चार मुले व कावेरी नावाची एक कन्यारत्न प्राप्त झाले. त्यांचे संगोपन करत उच्च शिक्षण व चांगले संस्कार देऊन योग्य मार्गदर्शन करून उच्च पदावर

नोकऱ्यांना लावले.
साधू संतानी म्हटले आहे कि,संसार रुपी मानवाने “कामात राम ” म्हंटले तरी त्याचा उद्धार होईल.परंतु वृंदावनीताई यांना त्याच्याही पलिकडे धार्मिकतेचे वेड होते.त्या फक्त किर्तनासाठी नारदाच्या गादीवर उभ्या रहाणेचं बाकी होत्या इतका त्यांना पांडुरंगाचा कृपाशिर्वाद प्राप्त झाला होता.
वै.ह.भ.प.वृंदावनीताई यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पाचही बहिण -भावडांनी आपल्या आईचे दायित्व पूर्णात्वाकडे नेण्यासाठी व ऋणातून मुक्त होण्यासाठी भागवताचार्य ह.भ.प. पंढरीनाथजी महाराज वृंदावनधाम यांच्या सुश्राव्य वाणीतून संगितमय केलेला श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा दि.२० मार्च ते २६ मार्च २०२२पर्यंत सायं७: ३०ते रात्री १०वा.पर्यंत त्याचबरोबर सकाळी८: ३०ते ११ वा.पर्यंत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता. तसेच रविवार २७ मार्च २०२२ रोजी ह.भ.प. रामेश्वर महाराज, आळंदी यांच्या काल्याच्या किर्तनाने सात दिवसाच्या सप्ताहाची सांगता करून तद्नंतर महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.
सदर कार्यक्रमास महसुल मंत्री बाळासाहेब थोरात व यांचे बंधु इंद्रजित थोरात उपस्थित होते. प्रारंभी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांची बहिण रोहिणीताई व माधवराव देशमुख व भाचे संग्राम यांच्या हस्ते आरती व ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पुजन करण्यात आले तसेच नितिनजी औताडे,जगन्नाथ पवार,जयंत रोहमारे,अॅड.राहुल रोहमारे,आमृतजी घुमाळ, संजयजी गुरसळ,डॉ. गोरखनाथजी रोकडे,प्रकाश करपे,अनिल माकोने यांनी व अशा अनेक मान्यवरांनी आपली भाषण रूपी श्रध्दांजली अर्पण केली.त्याचबरोबर अॅड.कावेरी बाजीराव पवार

(गुरसळ) यांनी आपल्या श्रध्दांजलीपर भाषणात ” आई ” या शब्दाचे विश्लेषण “आ” म्हणजे “आत्मा ” आणि “ई” म्हणजे “ईश्वर ” असे सांगून आईची महती व महत्व किती असते याचे वर्णन केले व पाच वर्षे असा प्रकारचा सोहळा साजरा करण्याचा निश्चय करून आलेल्या प्रत्येक

वारकऱ्यांला ज्ञानेश्वरी ग्रंथ देण्यात आला.
सदर कार्यक्रमास शासकीय,राजकीय,सामाजिक अशा अनेक क्षेत्रातील मान्यवर तसेच पंचक्रोशितील शेतकरी, नातेवायिक व गोरगरिब भाविक-भक्तांनी लाभ घेतला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!