Homeकोपरगावआपेगाव सोसायटीची निवडणूक अत्यंत खेळीमेळीत पार पडली असून या निवडणुकीत कोल्हे गटाचे...

आपेगाव सोसायटीची निवडणूक अत्यंत खेळीमेळीत पार पडली असून या निवडणुकीत कोल्हे गटाचे वर्चस्व

संपादक -राजेंद्र तासकर
तालुक्यातील पूर्व भागातील आपेगाव सोसायटीची निवडणूक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली असून या निवडणुकीत कोल्हे गटाचे सर्व तेरा सदस्य निवडून आले असून हा विजय संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक माजी मंत्री स्व शंकरराव कोल्हे यांना समर्पीत केल्याची माहिती आपेगांवचे जेष्ठ कार्यकर्ते व बाजार समितीचे माजी संचालक अंबादास पाटोळे यांनी दिली.विरोधी काळे परजने युतीचा दारुण पराभव झाला.
विजयी उमेदवारांमध्ये कोल्हे गटाच्या सर्वश्री ज्ञानदेव गायखे,वाल्मीक भूजाडे,लहानु गव्हाळे, सविता पूजाडे, शोभा गव्हाळे,हरिश्चंद्र लोहकरे, दादासाहेब गव्हाळे,रामभाउ खिलारी,संतोष पगारे,सुरेखा गोरे,पदमाबाई पाटोळे,नागनाथ गायकवाड,विजय रूपनर यांचा समावेश आहे, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजकमल गांगुर्डे यांनी तर त्यांना सहाय्यक म्हणून सचिव प्रवीण गव्हाळे यांनी काम पाहिले.
यावेळी श्री अंबादास पाटोळे बोलताना म्हणाले की, माजी मंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांचे पूर्व भागासह आपेगावावर नेहमीच विशेष लक्ष व प्रेम होते
या भागात नेहमीच कमी पर्जन्यमान होते त्यामुळे काळाची गरज ओळखून स्व शंकररावजी कोल्हे यांनी ४०वर्षापुर्वी गावाजवळील नदीवर गोडबोले बंधा-यांची निर्मीती करुन या भागातील शेतकरी बांधवांसाठी पाणी अडविण्याचे मोठेे कार्य केले होते,तसेच कमी पावसामुळे अनेकदा दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत असल्यामुळे रोजगार हमी योजनेच्या माध्यामातून देखील काम उपलब्ध करुन दिले होते. त्यामुळे गावातील नागरिकांना मोठा आधार मिळाला होता. स्व. शंकरराव कोल्हे या भागात आल्यानंतर नेहमी म्हणायचे की, पाऊस कमी होत असल्यामुळे या भागातील शेतकरी जगला पाहीजे त्याचे पशुधन वाचले पाहीजे याकरीता त्यांनी दुष्काळी परिस्थितीमध्ये येथे शेतकरी बांधवांच्या पशुधनास कारखान्याचा ऊस देखील चारा म्हणून पुरविला होता तसेच गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचे काळात गावासाठी योजनाही मंजूर केली, त्यांंचा आधार कधीही विसरु शकणार नाही असेही ते म्हणाले.
गावातील कै.मोतीराम पा.गव्हाळे,कै.काशिनाथ पा.गव्हाळे,कै.शंकरराव पा.भुजाडे यांना त्यावेळी सोबत घेऊन गावाचा विकास करण्यासाठी मोठे प्रयत्न केले. आता त्यांंची तिसरी पिढी देखील गावाच्या विकासाला चालना मिळावी म्हणून मको करीत आहे.
कोल्हे ल्कुटुंबांच्या पाठीशी भक्कमपणे आम्ही उभे आहेत. उपसरपंच श्री.किसन गव्हाळे यांनी सांगितले की,माजी आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी गावासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून गावासाठी मुख्य रस्त्याचे काम त्यांचे काळात केले असून या रस्त्यामुळे गावाचा रस्त्याचा प्रश्न सोडविला आहे आता देखील जिल्हा बँकेचे संचालक श्री विवेकभैय्या कोल्हे यांचे मार्दर्शनाखाली गावातील युवक एकजुटीने गावाच्या विकासात मोठे योगदान देण्याचे काम करत आहे.यावेळी सर्व नवनिर्वाचित संचालक व गावातील जेष्ठ कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!