Homeनाशिकसिन्नरआरोग्य सांभाळण्यासाठी नैसर्गिक व सेंद्रिय उत्पादनांचा वापर आवश्यक - राजेश गडाख

आरोग्य सांभाळण्यासाठी नैसर्गिक व सेंद्रिय उत्पादनांचा वापर आवश्यक – राजेश गडाख

पंचाळे गडाख प्राथमिक विद्यालयाचा विज्ञान दिनी परसबागेसाठी ‘कुंडीतील सेंद्रिय शेती’चा नाविण्यपूर्ण उपक्रम.

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

सिन्नर (प्रतिनिधी ) : – सिन्नर तालुक्यातील उपक्रमशील शाळा म्हणून उल्लेख असलेल्या सिन्नर भूषण सूर्यभानजी गडाख प्राथमिक विद्यालय पंचाळे या विद्यालयात २७ फेब्रुवारी विज्ञान दिन मोठ्या उत्साहात संपन झाला.

माध्यमिक लोक शिक्षण मंडळाचे सचिव राजेश गडाख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञान संसाधने, नाविन्यपूर्ण उपक्रम सादर केले. जंगल तोड, वाहतूक, स्वच्छता, वृक्षांची ऑक्सिजन कार्बन डाय-ऑक्साइड क्रिया, खगोलशास्त्र, वृक्षांच्या अवयवांचे कार्य, धान्य भरडणी यंत्र असे अनेक संसाधनांचे सादरीकरण याप्रसंगी करण्यात आले होते. गांडूळ खत निर्मिती उपक्रम व परसबागेतील कुंडीत पालेभाजी फळबाजीची लागवड हा नावीन्यपूर्ण उपक्रम याप्रसंगी विद्यालयाच्या वतीने राबविण्यात आला.

“रासायनिक औषधांच्या व खतांच्या भरमसाठ वापरामुळे मानवी आरोग्याबरोबरच सजीव सृष्टीही धोक्यात येत आहे. त्यामुळे अनेक समस्या व आजारांना आपल्याला सामोरे जावे लागते. रोगमुक्त आरोग्य जपण्यासाठी आपण सर्वांनी नैसर्गिक व सेंद्रिय पालेभाजी फळे पिकवायला व खायला हवीत” असे मत संस्थेचे सेक्रेटरी राजेश गडाख यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग बघितल्यानंतर ‘आपल्या विद्यालयात उपक्रमशील व आनंददायी शिक्षण मिळत असल्याने मनस्वी आनंद होत असल्याचे मत’ विस्तार अधिकारी मंजुषा साळुंखे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेशजी गडाख, प्रमुख अतिथी विस्ताराधिकारी मंजुषा साळुंखे, ज्येष्ठ शिक्षक आर.एस. गडाख, प्राचार्य विलास पवार, उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रमुख प्रवीण शेलार, सिताराम फटांगरे, सचिन शिंदे आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नवनाथ थोरात, नवीन लोखंडे, मयुरी हिवरडे, नायक पगार,शितल नाजगड, अंजली डुंबरे, पूजा जगदाळे, सायली जाधव या शिक्षकांबरोबरच लता बेलोटे यांनी मेहनत घेतली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!