
कोपरगाव : – कर्जत तालुक्यातील खातगाव येथील समर्थ रामदास स्वामी मठात सालाबाद प्रमाणे याही वर्षी समर्थ भक्त मोहनबुवा रामदासी यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान जयंती मोठ्या उत्साहात सादर करण्यात आली यावेळी परांडा उस्मानाबाद येथील रामचरितमानस महिला ग्रुपच्या वतीने सुंदर कांडचे पारायण करण्यात आले.

खातगाव येथे भक्त निवास बांधकाम सध्या वेगात सुरू आहे त्याचप्रमाणे गोशाळेचे काम चालू आहे यासाठी भाविकांनी मदत करावी असे आवाहन आनंदी नारायण कृपा न्यासचे वतीने करण्यात आले आहे.
समर्थ रामदास स्वामी यांनी चरित्रवान बलशाली सुदृढ समाज घडवण्यासाठी जागोजागी मारुती मंदिराची उभारणी केली समाजप्रबोधनासाठी भ्रमण करत असताना खातगावचे पंचक्रोशीस त्यांचा पदस्पर्श लागला व त्यांनी चांदा येथे मारुतीची स्थापना केली पुढे समर्थ सांप्रदायातील कल्याण स्वामींचे शिष्य केशव स्वामी यांनी कर्जतच्या मठात श्री दासबोध प्रतीचे लेखन केले. रामदासी परंपरा वाढावी यासाठी समर्थ भक्त मोहनबुवा रामदासी यांनी सन 2011 पासून या स्थानावर विशेष अध्यात्मिक कार्य सुरू केले आहे. या न्यासच्या वतीने येथे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी ग्रामीण भागातील रुग्णांसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचाराबाबत मुंबईतील तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वतीने सल्ला देण्यात येतो. समर्थांच्या साडेतीनशे वर्ष जुन्या पादुका या खातगाव मठात आहेत त्याचे नित्यनेमाने पूजन केले जाते. कोपरगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र कोकमठाण येथील ब्रह्मलीन संत रामदासी महाराज भक्त मंडळाच्या वतीने समर्थ भक्त मोहनबुवा रामदासी यांचा शरद थोरात व सहकारी बांधवांनी सत्कार केला. खातगाव मठात हनुमान मंदिरात विशेष सजावट करण्यात आली होती हनुमान जन्मासाठी छोटा पाळणा फुलांनी सजवण्यात आला होता, मुंबई पुणे यासह महाराष्ट्र राज्यातील समर्थ भक्त मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते श्रीराम जय राम जय जयराम चा जय जयकार करत हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले, शेवटी महाप्रसाद वाटण्यात आला. जास्त नवमी रामनवमी हनुमान जयंती गुरुपौर्णिमा या उत्सव काळात धार्मिक कार्याबरोबरच लहान मुलांचे संस्कार शिबिर येथे भरवले जाते, समर्थांची नित्य उपासना, सवाया येथे म्हटल्या जातात. समर्थ साहित्याचे अभ्यासक संशोधक श्री शंकर श्रीकृष्ण देव चरित्र ग्रंथा मध्ये कर्जत चांदे,रामदास स्वामी मठ उल्लेख आढळतो, गुगलच्या नकाशावर हे स्थान आल्यामुळे येथे भेट देणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय वाढलेली आहे.