
संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगांव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील चांदगव्हाण सहकारी सोसायटीच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत कोल्हे गटाचे उमेदवार विजयी झाले त्या सर्वांचे चांगदव्हाण गांवक-यांनी व सचिव संजय दिघे यांनी अभिनंदन केले आहे.
विजयी उमेदवारात सर्वश्री राजेंद्र चांडे (१२८), बाळासाहेब चांडे (१२६), रामदास चांडे (१२५), भागिनाथ चांडे (१२४), अंबादास चांडे (१२३), चंद्रभान शिंदे (१२३), लता शिंदे (१०९), सोमनाथ शिंदे (१०९), शोभा गुंडे (१२७), चंद्रकला शिंदे (११०), शिवाजी मोरे (१२५), मोहन शिंदे (११९), आदि उमेदवार विजयी झाले आहेत.या निवडणुकीकडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. माजीमंत्री शंकरराव कोल्हे व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे,भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी सातत्यांने चांदगव्हाण गावासाठी सर्व सहकार्य देत व्यक्तीगत व सामुहिक स्तरावर विकासाच्या अनेक योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. सहकारी संस्थेच्या माध्यमांतुन जिल्हा बँकेच्या विशेष प्रयत्नाने संचालक विवेक कोल्हे यांनी शेतक-यांसाठी असणा-या योजनाही तळागाळापर्यंत राबविण्यांसाठी प्रयत्न करत आहेत.चांदगव्हाण गांवक-यांनी व सोसायटीच्या सर्व सभासद शेतक-यांनी सोसायटीचा विजय स्व.शंकरराव कोल्हे यांना श्रध्दांजली म्हणून अर्पण केला आहे.