
संपादक – राजेंद्र तासकर
संपूर्ण जगात भयावह कोरोना महामारी चालू झाल्यापासून शासनाने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता “सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत ” मोबाईलद्वारे डिजिटल पध्दतीने शिक्षण चालू ठेवले,परंतु या डिजिटल पध्दतीचा विद्यार्थ्याच्या .डोळ्यांवर काही विपरित परिणाम झाला कि काय यासाठी सिन्नर तालुक्यातील शहा येथील एस डी जाधव इंग्लिश मिडियम स्कूल ही नाशिक जिल्हयातील पहिली शाळा असेल,कि त्यांनी नाशिक येथील बायफ संस्थेच्या विद्यमाने डॉ.अनंत भुजबळ ( एम.एस.नेत्ररोग तज्ञ) तसेच डॉ.अमोल थोरात यांचे मार्फत शाळेतील सर्व विद्यार्थी -विद्यार्थ्यांनी,शिक्षक -शिक्षिका व शालेय कर्मचाऱ्यांचे नेत्र

तपासणी शिबीर संपन्न करण्यात आले .
या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.संभाजी जाधव सर, शहा गावच्या सरपंच सौ.शुभांगी जाधव मॅडम,शाळेचे मुख्याध्यापक श्री.नीलकंठ सर व सर्व शिक्षक -शिक्षिका व विद्यार्थी- विद्यार्थीनी उपस्थित होते.
प्रथम आलेल्या तज्ञांचे शाळेचे अध्यक्ष श्री.संभाजी जाधव सर यांनी गुलाब पुष्प देऊन सन्मान केला तर शाळेचे मुख्याध्यापक श्री.निळकंठ सर यांनी शेवटी आभार मानले.