
कोपरगाव : – पूज्यनीय पद्मभूषण स्वर्गीय के.जे. सोमैया यांच्या जयंती निमित्त सोमैया स्पोर्ट्स अकॅडमी मुंबई व सोमैया विद्यामंदिर,लक्ष्मीवाडी आयोजित जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा सोमैया विद्यामंदिर, लक्ष्मीवाडी येथे दिनांक 24 व 25 मे 2025 या कालावधीत पार पडल्या.

यावेळी मुख्याध्यापक श्री.मारुती गहिनीनाथ धायताडक सर,सरपंच दत्तात्रय क्षीरसागर, उपसरपंच विकास जपे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र आगलावे, ग्रामपंचायत सदस्य संजय जपे, उपसरपंच वारी विजय कचरू गायकवाड,योगेश मोकळ, डॉ.कौस्तुभ भोईर इत्यादी मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

सदर स्पर्धेत संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील सुमारे 125 बॅडमिंटनपटू खेळाडु सहभागी झाले होते. 11 वर्षाखालील मुलांच्या गटात जीत मुथियान विजयी तर शर्वील काळे उपविजयी, 13 वर्षाखालील मुलांच्या गटात सक्षम आगरकर विजयी तर जीत मुथियान उपविजयी, 13 वर्षाखालील मुलींच्या गटात सायली माने विजयी तर दीक्षा हुसळे उपविजयी, 15 वर्षाखालील मुलांच्या गटात अशर शेख विजयी तर मिथिलेश पवार उपविजयी, 15 वर्षाखालील मुलींच्या गटात नीरजा गुगले विजयी तर तनिष्का जगताप उपविजयी, 17 वर्षाखालील मुलांच्या गटात आर्यन राठोड विजयी तर अशर शेख उपविजयी, 17 वर्षाखालील मुलींच्या गटात नीरजा गुगले विजयी तर किमया आहेर उपविजयी,मुलींच्या खुल्या गटात तेजल कुलाल विजयी तर श्रद्धा मलिक उपविजयी, पुरुष गटात मनोज जगदाळे विजयी तर किरण वर्पे उपविजयी, पुरुष दुहेरीत किरण कर्पे मनोज जगदाळे विजयी तर राजवीर आढाव आर्यन राठोड उपविजयी, 17 वर्षाखालील मुलांच्या दुहेरीत अशर शेख व राजवीर कुक्कडवाल विजयी तर राजवीर आढाव व आर्यन राठोड उपविजयी झाले आहे.

सदर स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभास प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ व राष्ट्रीय बॅडमिंटनपटू प्रीतम जपे, कोपरगाव तालुक्यातील उद्योजक व राष्ट्रीय बॅडमिंटनपटू श्री रवि आढाव, कोसकाचे पदाधिकारी तसेच अहिल्यानगर क्रीडा संघटनेचे अध्यक्ष श्री.अरुण चन्द्रे, बेसबॉल संघटनेचे अध्यक्ष मकरंद कोऱ्हाळकर, राष्ट्रीय बॅडमिंटनपटू व प्रशिक्षक मल्हार कुलकर्णी, राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक वडांगळे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते संपन्न झाले.
सन्मानीय समीर सोमैया यांच्या दूरदृष्टीने, लक्ष्मीवाडी येथे क्रीडा अकादमीचे काम प्रगतीपथावर असून बॅडमिंटनचे चार कोर्ट, क्रिकेटचे भव्य मैदान, स्क्वॅश कोर्ट, 400 मीटर रनिंग ट्रॅक चे काम अंतिम टप्प्यात आहे. ग्रामीण भागातून देशाचे नेतृत्व करणारे खेळाडू निर्माण व्हावेत या दुरदृष्टीने सन्मानीय समीर सोमैया यांनी या अकादमीची निर्मिती केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन व पारितोषिक वितरणाचे सूत्र संचालन व्हॉलीबॉल खेळाडू व पंच श्री. राजेंद्र कोहकडे यांनी आपल्या अमोघ वाणीत करून सर्वांची मने जिंकली.
स्पर्धेच्या आयोजनात क्रीडा अकादमीचे संचालक एझाझ सर, आदित्य सर, जी. बी. एल.साकरवाडी चे डायरेक्टर तथा एल एम सी सेक्रेटरी मा.श्री. सुहास गोडगे, अक्षत सर, महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे मिलिंद कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले मुख्याध्यापक श्री.मारुती धायताडक सर यांच्या उत्साही नेतृत्वाखाली. स्पर्धेचे उत्कृष्ट व्यवस्थापन क्रीडा शिक्षक श्री. संजय अमोलिक सर यांनी केले.