
कोपरगाव : – आरसीएफ कंपनी मुंबई व जगदंबा फाउंडेशन अंतर्गत साऊ एकल महिला समिती HCG मानवता कॅन्सर सेंटर नाशिक,सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठान कोपरगाव लिओ व लायनेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने लायन्स पार्क या ठिकाणी एकल महिलांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर पार पडले.

या शिबिरामध्ये महिलांची मॅमोग्राफी व पॅप स्मिअर तसेच ओरल स्क्रीनिंग दंत तपासणी करण्यात आली. 97 महिलांनी यामध्ये सहभाग नोंदवला. यावेळी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.अमोल अजमेरे, स्त्री रोग तज्ञ डॉ. रोशनी आढाव, डॉ.अंकित कृष्णाणी तसेच HCG मानवता कॅन्सर सेंटरची सर्व टीम. त्याचप्रमाणे साऊ एकल महिला समिती महाराष्ट्र राज्य निमंत्रक हेरंबा कुलकर्णी , प्रतिमा कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.
यावेळी डॉ.अमोल अजमेरे महिलांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, महिलांच्या दृष्टीने हा अत्यंत अत्यावश्यक व स्तुत्य उपक्रम आहे. दर सहा महिन्याला महिलांनी अशा तपासण्या करून घेतल्या पाहिजे. सद्यस्थितीमध्ये कॅन्सर या आजाराला बळी पडण्याचे प्रमाण महिलांचे जास्त आहे. कॅन्सर सारख्या आजाराचे लवकर निदान केल्यास पूर्णपणे बरा होऊ शकतो. या आजाराला घाबरण्याचे कारण नाही असा विश्वास त्यांनी महिलांना दिला. महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली तरच ती कुटुंब सुस्थितीमध्ये ठेवू शकते. महिला हीं कुटुंबाचा कणा आहे. डॉक्टर रोशनी आढाव देखील म्हणाल्या कि, घरातला करता पुरुष गेल्यामुळे या महिलेवर कुटुंबाचे संपूर्ण जबाबदारी आहे त्यामुळे तिने स्वतःचे आरोग्य सुस्थितीत ठेवण्याची गरज अत्यंत आहे. डॉ. अंकित कृष्णानी यांनी दंत विषयक मार्गदर्शन केले. अगदी कमी दरामध्ये लायन्स पार्क या ठिकाणी डेंटल क्लिनिक उपलब्ध करून दिलेले आहे त्याचा महिलांनी लाभ घ्यावा.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष संगीता मालकर यांनी केले. कार्यक्रमासाठी ज्ञानेश्वर वाकचौरे, सुनीता वाकचौरे, जेष्ठ नागरिक सेवा मंचचे कार्याध्यक्ष विजय बंब,योगाचार्य ऊत्तम भाई शहा, जवाहरलाल शहा, एड. जयंत जोशी, कृषी मार्गदर्शक अरविंद मालकर, भाऊसाहेब साळुंके, स्वाती काळे, वर्षा गंगुले, स्मिता पोळ, अर्चना पाटील आदि उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती मुळे यांनी केले तर शेवटी उपस्थितांचे आभार श्रद्धा शिंदे यांनी मानले.