Homeकोपरगाववैजापुरातील शिव महापुराण कथेसाठी तीन लाख भाविकांची उपस्थिती

वैजापुरातील शिव महापुराण कथेसाठी तीन लाख भाविकांची उपस्थिती

प्रदीप मिश्रा यांच्या रसाळ वाणीतून शिव महापुराण ऐकण्यासाठी महिलांची अलोट गर्दी

कोपरगाव : – वैजापुरातील संचेती परिवाराने प्रदीप मिश्रा सिहोर मध्य प्रदेश यांच्या रसाळ वाणीतून शिवमहापुराण कथेचे 26 जून पासून आयोजन केले असून त्यासाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे. रविवारी कथेचा चौथा दिवस होता. कार्यक्रम स्थळावर सुमारे तीन लाख भाविकांची उपस्थिती होती. तर भ्रमणध्वनीच्या सहाय्यातून दोन लाख भाविकांनी हा सोहळा प्रत्यक्ष पाहिला.

परमपूज्य प्रदीप मिश्रा या प्रसंगी बोलताना म्हणाले की, प्रत्येकाच्या जीवनाचा शेवट कुठे आहे हे कोणालाच अद्याप कळलेलं नाही, तेव्हा परमेश्वराची आराधना, दानधर्म, सत्कर्म, गोसेवा, परोपकार, नामस्मरण करा, आज भौतिक सुखामुळे सर्वत्र ऑलवेल आहे. प्रत्येकाला घाई आहे, जो तो आपल्या कामात मग्न आहे, कुणाजवळही वेळ नाही. थांबायला कोणीही तयार नाही, कुणाचीही निंदा करू नका, भगवंताने लाख मोलाचा देह दिला आहे त्याद्वारे या भूतलावर जेवढी होईल तेवढी सेवा करा. प्रत्येक जण क्रोधित होऊन दुसऱ्यांना दोष देत असतो. प्रत्येकाचं भाग्य उजळण्यासाठी महादेवाची सेवा महत्त्वाची आहे. शिवलिंगावर बेलपत्र वाहताना ओम नमः शिवाय मंत्र उच्चारण करून, आपल्या इच्छेचे निमंत्रण देऊन पुन्हा ओम नमः शिवाय म्हणत ते अर्पण करावे.

शिव महापुराण कथेसाठी सहा मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड, इत्यादी विविध राज्यातून विक्रेते वस्तू विक्रीसाठी वैजापुरात आले आहेत. डमरू ओम नमः शिवाय किचन, प्रदीप मिश्रा यांचे छायाचित्रे, प्लास्टिक कागद,चॉकलेट, गोळ्या बिस्किटे, निरंजन, रुद्राक्ष वृक्ष, या सर्व विविध खाण्याच्या वस्तू महापुराण कार्यक्रम स्थळी रेलचेल आहे.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, चंद्रकांत खैरे माजी मंत्री अब्दुल सत्तार, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, वैजापूरचे आमदार बोरणारे, जालना येथील आमदार, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते त्यांच्यासाठी व्हीआयपी व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय प्रदीप मिश्रा यांची व्यक्तिगत सुरक्षा यंत्रणा कार्यरत होती. दूरवरून येणाऱ्या वाहनांसाठी कार्यक्रम स्थळापासून वैजापूर चौफुलीवर पार्किंग साठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. वैजापूर आगाराच्या वतीने स्वतंत्र भाविकांची ने -आण करण्यासाठी स्वतंत्र बसची व्यवस्था करण्यात आली होती महिलांना अर्धी तिकीट असल्यामुळे बहुतांश महिलांनी कथा ऐकण्यासाठी गर्दी केली होती. प्रत्येकाच्या कपाळी ओम नमः शिवाय टिळा लावण्यासाठी बच्चे कंपनी गर्दीमध्ये एकमेकांमध्ये मिसळून आनंद घेत होती. दुपारी दीड वाजता प्रदीप मिश्रा यांनी कथेस सुरुवात केली, बरोबर चार वाजता ओम नमः शिवाय आरतीने चौथ्या दिवसाची सांगता करण्यात आली.

कथेस दूरवरून मुक्कामी थांबलेल्या भाविकांची, महिलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. मुक्कामी थांबलेल्या भाविकांसाठी कार्यक्रम स्थळावर भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. हौसे नवसे गवसे कार्यक्रमास हजेरी लावतात. रविवार असल्यामुळे भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अधून मधून पावसाचे फवारे येत होते.

वैजापूर शिव महापुराण कथा ऐकण्यासाठी विविध राज्यातील भाविक गेल्या आठ दिवसापासून मुक्कामी थांबलेले आहेत. दररोजच्या कथेमध्ये प्रदीप मिश्रा भाविकांना आलेल्या अनुभवांचे कथन करतात. 24 वर्षापासून अपत्य होत नाही ही समस्या घेऊन प्रदीप मिश्रा यांनी दिलेल्या श्रद्धेतून केलेल्या सेवेतून अपत्य प्राप्त झालेले जोडपे वैजापूर येथील कार्यक्रमास आले होते. नाशिक येथील एका रुग्णास किडनीचा आजार होता तो प्रदीप मिश्रा यांच्या सेवेतून बरा झाला ते देखील या प्रसंगी उपस्थित होते. पुढचे शिव महापुराण जुलैमध्ये छत्तीसगड येथे असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थित भाविकांनी नाचत शिवमहापुराण कथेचा आनंद घेतला. एक लोटा जल सारे समस्या का हाल या घोषवाक्यसेवेतून प्रदीप मिश्रा भारत देशासह, आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले आहेत. वैजापुरातील असंख्य स्वयंसेवक सदरची शिवमहापुराण कथा सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!