Homeकोपरगावयेथे बच्चुभाऊं कडू याच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरा सह विविध कार्यक्रमाचे आयोजन

येथे बच्चुभाऊं कडू याच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरा सह विविध कार्यक्रमाचे आयोजन

कोपरगाव :- राहुरीत प्रहार दिव्यांग संघटना व दिव्यांग शक्ती सेवा संस्थेच्या वतीने दिव्यांग स्वाभिमान दिन, व दिव्यांग हृदयसम्राट माजी राज्यमंत्री मा. ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडु यांच्या वाढदिवसा निमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यामध्ये शंभर दिव्यांग बांधवांनी सहभाग घेऊन 20 दिव्यांग बांधवांनी रोटरी ब्लड बँक राहुरी या ठिकाणी रक्तदान केले तसेच अहिल्याबाई भवन येथे शोभेचे झाडे लावून वृक्षारोपण केले. विशेष करुन बॅनरबाजी अवांतर खर्चाला फाटा देऊन राहुरी स्टेशन येथील कृपा वृध्दाश्रमास बाजरीची एक गोणी देण्यात आली.

दरवर्षी 2012 पासून राहुरीत असे उपक्रम वाढदिवसानिमित्ताने राबविण्यात येतात. दिव्यांगांचे हृदयसम्राट मा. बच्चूभाऊ कडू यांना दिव्यांगांनी वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळी राहुरीचे धडाडीचे कार्यकर्ते तसेच प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा.मधुकर घाडगे म्हणाले कि, भाऊंची लढाऊ वृत्ती, आणि पारदर्शकता तसेच हृदयसम्राट म्हणून ओळख निर्माण करणारा संघर्ष आजही लाखो शेतकरी, शेतमजूर, वृद्ध, विधवा व दिव्यांग बांधवांना ऊर्जा देतो आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच श्रीं साईचरणी प्रार्थना.

यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा.मधुकर घाडगे साहेब, जिल्हा सल्लागार सलीमभाई शेख, राहुरी तालुकाध्यक्ष योगेश लबडे, राहुरी मुकबधिर संघटनेचे अध्यक्ष वेणुनाथ आहेर, शहराध्यक्ष जुबेर मुसानी, रवींद्र भुजाडी, दताञय खेमनर, भरत आढाव, बाळासाहेब गाडाळ, सतिष तरवडे,सखाहरी दिघे, चेतन मोरे, दिलीप काळे,फिरोज मन्सुरी, अकिल शेख,अक्षय गायकवाड, सतीश तरवडे, योगेश खामकर,आदिनाथ जाधव,उमेद शेख, विक्रम चव्हाण,अकिल पठाण, आशिष वाकोडे, दत्तात्रय आरखडे आदी प्रहार सैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी रोटरी क्लब ब्लड बँक राहुरी वतीने डॉ.कोळसे, डॉ. पटेल यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्याबद्दल त्यांचेही शेवटी आभार मानण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!