Homeकोपरगावश्रीमान गोकुळचंद विद्यालयात आषाढी एकादशी उत्साहात साजरी

श्रीमान गोकुळचंद विद्यालयात आषाढी एकादशी उत्साहात साजरी

श्रीमान गोकुळचंद विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थी झाले वारकरी

कोपरगाव : – श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उमाताई वहाडणे व त्यांच्या सहकारी तसेच कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे, सचिव दिलीप अजमेरे, सहसचिव सचिन अजमेरे तसेच स्थानिक स्कुल कमेटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे, डॉ. अमोल अजमेरे, आनंद ठोळे, राजेश ठोळे, संदीप अजमेरे आदि उपस्थित होते.

सर्व सहभागी विद्यार्थ्यांना त्यांनी एकादशी निमित्त शुभेच्छा दिल्या. सौ उमाताई वहाडणे यांनी आषाढी आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची माहिती सादर केली व त्यांची प्रतिमा विद्यालयास भेट दिली.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक रघुनाथ लकारे यांनी केले. यावेळी उपमुख्याध्यापक अनिल अमृतकर, पर्यवेक्षक बलभीम उल्हारे, दिलीप तुपसैंदर आदि शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विठ्ठल – रुक्मिणी, संत मीराबाई, संत जनाबाई, संत निवृत्तीनाथ, संत तुकाराम अशा अनेकविध महाराष्ट्रातील संतांची तसेच वारकऱ्यांची वेशभूषा साकारली.यात सहभागी विद्यार्थ्यांना संस्थेचे सचिव दिलीप अजमेरे यांनी रोख पारितोषिके दिली. विद्यालयाचे कलाशिक्षक श्री. अतुल कोताडे , श्री.योगेश गवळे, श्री. डोळे यांनी विद्यार्थींना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.कुलदीप गोसावी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पंकज जगताप, श्रीकांत डांगे,संजय बर्डे,कलाशिक्षिका सौ.अजमेरे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!