
कोपरगाव:- रयत शिक्षण संस्थेचे, श्री सदगुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथे सौ. सुशीलाबाई उर्फ माईसाहेब शंकररावजी काळे यांच्या स्मरणार्थ ऑनलाइन आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा शुक्रवार दि.२ जानेवारी व शनिवार दि. ३ जानेवारी २०२६ रोजी आयोजित केली आहे. या स्पर्धेचे हे २५ वे वर्ष आहे. सहकार, शिक्षण, समाजकारण, शेती आणि जलसिंचन क्षेत्रात भरीव कार्य करणारे राज्याचे सहकार व शिक्षण मंत्री पद भुषविलेले रयत शिक्षण संस्थेचे १५ वर्षे चेअरमन उपाध्यक्ष, माजी खासदार व को. सा. का. उद्योग समूहाचे शिल्पकार म्हणून स्वर्गीय शंकररावजी काळे अवघ्या महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. कै. सुशिलाबाई (माई) शंकरराव काळे यांचा गौतम एज्युकेशन सोसायटी तसेच शिक्षण क्षेत्राशी अत्यंत जवळचा संबंध होता. माईनीं या महाविद्यालयाशी सतत संपर्क ठेवून कृतिशील जिव्हाळ्याचे नाते निर्माण केलेले होते. तरी त्यांच्या स्मृतीचा सुगंध न संपणारा आहे. हा ‘स्मृती ठेवा पण तिच्या रूपाने उच्च शिक्षण क्षेत्राचा जपावा’ या भावनेने काळे कुटुंबाच्या सहकार्याने भव्य राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन केलेले असून स्पर्धेसाठी आपण महाविद्यालयातील दोन स्पर्धकांचे व्हिडिओ पाठवावे.
स्पर्धेचे विषय:
१. एक समर्पणशील त्यागमूर्ती सौ. सुशिलाबाई उर्फ माईसाहेब शंकरराव काळे
२. शेती, औद्योगिक धोरणे आणि ग्रामीण विकास
३.वाचन संस्कृती: काळाची गरज
४. भारताच्या विकासाच्या दिशा
५.ऐका आपल्या शिक्षणाची कहाणी
६.राष्ट्रीय चारित्र्य विकासात युवकांची जबाबदारी
७. जो जे वांच्छिल तो तें लाहो
८.महिला आरक्षण आणि त्यांचा राजकीय वाटा
९.कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपण
१०.बाल हक्क आणि देश विकास
११.कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब :मातीचे ऋण फेडणारा योगी
खालील लिंकवर क्लिक करून स्पर्धेतील आपला सहभाग नोंदवावा.अंतिम दिनांक ०१ जानेवारी २०२६
- https://forms.gle/9Lhe1WCBLkEfjH5d6
व्हिडिओ पाठवण्याचा टेलिग्राम नंबर प्रा. किरण पवार-९५५२९८१०६५
असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) माधव सरोदे यांनी केले आहे. या स्पर्धेचे मुख्य संयोजक
प्रो. (डॉ.) संतोष पवार हे आहेत. संपर्क क्रमांक -९४२२७९६६७८