
कोपरगाव :- सालाबादप्रमाणे याहीवर्षी तालुक्यातील कुंभारी येथे परीट धोबी समाजाच्या वतीने संत गाडगे महाराज यांची 69 वी पुण्यतिथी महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. खंडेरावजी कडलक साहेब तसेच प्रमुख अतिथी अनिलजी देसाई महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाचे प्रसिद्धी प्रमुख यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर कार्यक्रम मा. श्री. खंडेरावजी कडलक महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ प्रदेशाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख अतिथी मा. श्री. अनिलजी देसाई महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ प्रसिद्धी यांसह
कुंभारी ग्रामपंचायत लोकनियुक्त प्रथम महिला सरपंच सौ. देवयानी प्रशांत घुले, उपसरपंच सौ. कविता ललित निळकंठ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कोपरगाव उपतालुका प्रमूख राजुभाई शेख, सोसायटी नं.१ चे संचालक श्री. सतीशजी कदम, श्री. सोपानराव चिने कुंभारी नं.२ सोसायटीचे चेअरमन, राघवेश्वर सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री. गोपीनाथजी निळकंठ, श्री. सुनीलजी कदम भाजपा कोपरगांव पश्चिम मंडल तालुकाध्यक्ष, कुंभारी नं.१ सोसायटीचे माजी. चेअरमन श्री. डॉ. विश्वंभर कदम, श्री मच्छिंद्र कदम कुंभारी नं.१ सोसायटीचे संचालक, श्री. चंद्रशेखर गवळी, श्री. हनुमानजी गवळी, श्री. भाऊसाहेबजी सुडके उमंग युवा प्रतिष्ठान आदि मान्यवर, महिला व ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न करण्यात आला.

अध्यक्ष स्थानावरून बोलतांना मा. श्री. खंडेरावजी कडलक म्हणाले कि, ज्यावेळी संत गाडगे महाराज किर्तन रुपी समाज प्रबोधन करत असत त्यावेळी टाळ नव्हते तर त्यांनी दगडावर दगड मारत आपल्या किर्तनास सादसंगत तयार करायचे आणि अंधश्रध्दा व स्वच्छतेचे महत्व जगाला आपल्या किर्तनातून पटवायचे असे संत पुन्हा कधी नाही होणार.

पुढे ते म्हणाले, संतानी आपल्याला संस्काराची मोठी शिदोरी बांधुन ठेवली असून त्या शिदोरीचा आपल्या जीवनात उपयोग करून आपले जीवन सुखी, समाधानी व चारित्र्य संपन्न कसे घडविता येईल आणि समाजासह गावाची ग्रामसंमुद्धी कशी जोपासता येईल यासाठी रात्रीचा दिवस करणारे संत म्हणजे गाडगे महाराज यासह त्यांच्या जीवनातील अनेक दाखले त्यांनी दिले. याबरोबरच वाल्मीक निळकंठ सर, सरपंच सौ. देवयानी घुले व बालगोपालांनी आपले मनोगत व्यक्त केले


कार्यक्रम यशस्वीतेसाठी कुंभारी परिट धोबी सेवा मंडळ अध्यक्ष सुनिल गायकवाड, दत्तात्रय गायकवाड उपाध्यक्ष, सदस्य विठ्ठल गायकवाड, सुरेश गायकवाड, नीलेश गायकवाड, यशवंत गायकवाड, विजय जाधव, दिपक वाघ, रमन खंडू गायकवाड, संतोष गायकवाड आदिंनी अथक परिश्रम घेतले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.आरती दिपक वाघ व सौ. सोनाली निलेश गायकवाड यांनी केले तर उपस्थितांचे आभार रमण यादव गायकवाड यांनी मानले.
शेवटी आलेल्या सर्व पाहुण्यांनी व ग्रामस्थांनी कुमारी कीर्ती जाधव व परेश जाधव या बहीण भावंडांच्या भावगीतांनी मंत्रमुग्ध होऊन संत गाडगे महाराजांच्या प्रसादाचा लाभ घेतला.