
कोपरगाव : – नासिक येथिल बी.पी. पाटील जुनियर कॉलेज आणि दै.पुढारी वृत्तपत्र माध्यमाच्या संयुक्त विद्यमाने डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम शिष्यवृत्ती परीक्षेत यावर्षी तालुका स्तरीय स्पर्धा परीक्षा १४ डिसेंबर रोजी विद्यालयात पार पडली. या परीक्षेत सुमारे ५५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या विद्यार्थ्यांमधून श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचा कु. साई नारायण कुलकर्णी हा तालुक्यात प्रथम आला असुन त्याला ५१००० ची स्कॉलरशिप मिळाली. त्यानंतर पार पडलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धात पिंपळगाव बसवंत या ठिकाणी असणाऱ्या बीपी पाटील जुनिअर कॉलेज मध्ये आयोजित या स्पर्धेत अहिल्यानगर व नाशिक दोन्ही जिल्हातुन एकूण ५५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या मध्ये देखिल श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचा विद्यार्थी कु. साई नारायण कुलकर्णी हा द्वितीय आला असुन त्याला १२१००० रु इतकी स्कॉलरशिप मिळाली.
पत्रकार दिनाचे औचित्य साधून सन्माननीय पत्रकार व संस्थाचालकाच्या वतीने माता – पित्यासह कु. साई कुलकर्णी याचा सत्कार करण्यात आला .
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे, सचिव दिलीप अजमेरे, स्थानिक स्कुल कमिटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे, सहसचिव सचिन अजमेरे,आनंद ठोळे, डॉ. अमोल अजमेरे, राजेश ठोळे, संदीप अजमेरे, माजी मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर, ज्येष्ठ कला शिक्षक दिलीप तुपसैंदर, मुख्याध्यापक रघुनाथ लकारे, उपमुख्याध्यापक अनिल अमृतकर, पर्यवेक्षक बलभिम उल्हारे या सर्वांनी साई कुलकर्णीचे त्याचबरोबर त्याचे मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे देखिल अभिनंदन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर देसाई सर यांनी केले.