
साई संजीवनी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी विवेक बिपीनदादा कोल्हे यांची निवड झाल्याबददल त्यांचा सत्कार करण्यात आला.
संपादक -राजेंद्र तासकर
माजीमंत्री स्व शंकररावजी कोल्हे यांनी राज्यात प्रगतीपथावर नेलेल्या साई संजीवनी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी विवेक बिपीनदादा कोल्हे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यांत आली त्याबददल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
श्री.विवेक कोल्हे यांच्या नावाची सुचना उपाध्यक्ष रेवजी रूंजाजी आव्हाड यांनी मांडली तर त्यास संचालक संभाजीराव रक्ताटे यांनी अनुमोदन दिले.साई संजीवनी बँकेचे संस्थापक माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर श्री.विवेक कोल्हे यांची निवड करण्यांत आली.निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक एन.जी.ठोंबळ यांनी काम पाहिले तर श्री.रहाणे यांनी सहकार्य केले.
याप्रसंगी संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे,संचालक जयंतीलाल उर्फ रामुशेठ पटेल, बापूसाहेब बारहाते,विश्वनाथ जावळे,विधीज्ञ अशोकराव टुपके, नारायण अग्रवाल,सौ.गंगुबाई विश्वनाथ जावळे,सौ.संगीता बापूसाहेब बारहाते,शरदराव गवळी आदि उपस्थित होते.
प्रारंभी साई संजीवनी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.पदमाकर सभारंजक यांनी बॅकेच्या आर्थीक प्रगतीचा अहवाल सादर करून माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी बँकेच्या प्रगतीसाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या होत्या त्याबाबत माहिती दिली.
सत्कारास उत्तर देतांना नवनिर्वाचित अध्यक्ष विवेक कोल्हे म्हणाले की,माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या रिक्त जागेवर अध्यक्ष म्हणून काम करण्यांची संधी मिळाली त्याचे सोने करू.त्यांनी घालून दिलेल्या आर्थीक शिस्तीचे तंतोतंत पालन करू,संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे,संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेवु.बँकेकडे ८२ कोटी रूपयांच्या ठेवी असुन आजवर ५६ कोटी रूपयांचे कर्ज वाटप केले आहे,तर ३१ मार्च अखेर आर्थीक वर्षात बँकेस ८५ लाख रूपयांचा नफा झाला आहे. थकबाकीचे प्रमाण अवघे ३ टक्के आहे.साई संजीवनी बँकेच्या आजवरच्या आर्थीक प्रगतीसाठी बँकेला राज्यस्तरावर बँक फेडरेशन व महाराष्ट्र राज्य बँक असोसिएशनच्यावर्तीने दरवर्षी नाशिक विभागात राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट बँक म्हणून पुरस्कार मिळालेले आहे.
श्री.विवेक कोल्हे यांच्या निवडीबददल त्यांचे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष उदय शेळके,उपाध्यक्ष माधवराव कानवडे,शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष संभाजीराव गावंड, उपाध्यक्ष विलास कुलकर्णी, सहकारमहर्षी कोल्हे कारखान्यांचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे,सर्व आजी माजी संचालक,अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान, संजीवनी पतसंस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम बोरावके,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्ता काले यांच्यासह संजीवनी उद्योग समुहाच्या विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सर्व सहकारी,आदींनी अभिनंदन केले आहे.शेवटी संचालक संभाजी रक्ताटे यांनी आभार मानले.