HomeUncategorizedसमता पतसंस्थेचा कारभार पारदर्शक ; काकासाहेब कायटे यांचा पत्रकार परिषद घेऊन निर्वाळा

समता पतसंस्थेचा कारभार पारदर्शक ; काकासाहेब कायटे यांचा पत्रकार परिषद घेऊन निर्वाळा

कोपरगाव : – काही दिवसापूर्वी नाशिक जिल्हयातील मिरगाव येथे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्रातील जनता हादरून गेली असून, अनेकांच्या भावनांचा चक्काचूर झाला आहे. सदर घटनेची पार्श्वभूमी लक्षात घेता समता पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ काकासाहेब कोयटे यांनी मुख्य आरोपींबद्दल समता पतसंस्थेतील व्यवहाराबाबत पत्रकार परिषद घेऊन निर्वाळा देतांना म्हटले कि, समता पतसंस्थेच्या महाराष्ट्र भर विविध शाखा असून त्यापैकी काही शाखांमध्ये अशोक खरात व त्याची पत्नी, एक मुलगा, एक मुलगी यांचे झालेले व्यवहार हे पारदर्शक आहे. यांत शंका नाही.

सविस्तर वृत्त असे कि, महाराष्ट्रामध्ये समता पतसंस्थेच्या अनेक शाखा असून त्यापैकी काही शाखांमध्ये मिरगाव घटनेतील मुख्य आरोपी अशोक खरात त्याची पत्नी, एक मुलगा, एक मुलगी यांचे व वारसदार यांचे नावाने जवळपास 70 ते 72 खाते असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. त्याचबरोबर तो स्वतः 47 खात्यांना वारसदार असल्याची माहीती त्यांनी दिली. आमच्या संस्थेमध्ये त्याने साधारणत: 2021 साली खाते उघडलेले आहे. या खात्यांमध्ये त्याने 15 कोटी रुपयांचे व्यवहार केलेले आहे. सर्व खाते हे कायदेशीर रित्या केवायसी केलेले आहे. आमच्या पतसंस्थेमध्ये खाते उघडण्यासाठी येणार्‍या व्यक्तीस खाते उघण्यास नाही म्हणता येत नाही. संस्थेच्या नियमानुसार पूर्तता करणाऱ्या व्यक्तीला खाते उघडुन देणे हे आमचे कर्तव्य असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. याचबरोबर त्यांनी असेही सांगितले की, आम्ही वेळोवेळी सर्व खात्यांची कायदेशीर तपासणी तज्ञांकडुन कसून घेतली आहे. त्यामुळे सदर व्यक्तीने केलेले व्यवहार हे पतसंस्था अॅक्ट नुसार संस्थेच्या नियमास धरून झालेले आहे. त्यामध्ये सेव्हींग, करंट अकाऊंड, मुदत ठेव असेल यासारखे व्यवहार हे पतसंस्था अॅक्ट नुसार रितसर खातेधारकाच्या परवानगीने झालेले आहे. यासंदर्भात पोलीस प्रशासनाने मागितलेली संपूर्ण माहीती आम्ही त्यांना सूपूर्त केली असून यामध्ये कुठलीही त्रुटी राहीलेली नाही. पुढील कार्यवाही ही पोलीस प्रशासनाची आहे. यामध्ये कुठलाही गैरव्यवहार झालेला नसून, समता पतसंस्थेचा कारभार हा पारदर्शक असून, सभासदांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच प्रसार माध्यमांनी चूकीच्या अफवा पसरवू नये असा निर्वाळा समता पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ काकासाहेब कोयटे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!