Homeकोपरगावमाजीमंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांचे विचार नव्या पिढीला प्रेरणादायी - स्वामी...

माजीमंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांचे विचार नव्या पिढीला प्रेरणादायी – स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

कोपरगांव:- सहकार क्षेत्राला दिशा देण्यात सहकारमहर्षी, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सात दशके काम केले. नव्या पिढीला त्यांचे विचार प्रेरणा देणारे असून स्व. शंकरराव कोल्हे यांनी स्वामी सहजानंदभारती यांच्या सहवासातून सहज आनंद देणारे नगर सहजानंदनगर (संजीवनी) वसविले. साखर उद्योगाबरोबरच विविध प्रयोगात्मक शेतीतील त्यांचे अनुभव अनंत काळाचा ठेवा असल्याचे प्रतिपादन श्री दत्त मंदिर संस्थान श्रीक्षेत्र देवगड (नेवासा) चे महंत स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांनी केले.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे व्यक्ती आणि विचार भाग तीन या पुस्तकाचे प्रकाशन स्व. शंकरराव कोल्हे यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त नुकतेच प्रकाशित करण्यांत आले. या पुस्तकासाठी श्री दत्त मंदिर संस्थान श्रीक्षेत्र देवगड देवस्थानचे प्रमुख महंत भास्करगिरी गुरु किसनगिरी महाराज यांनी प्रस्तावना दिली असुन त्याची प्रत स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांचेकडे सुपूर्द करण्यांत आली त्याप्रसंगी ते बोलत होते. या पुस्तकाचे संपादन पत्रकार महेश मधुकर जोशी यांनी केले आहे. पुस्तके, ग्रंथ हे सतत मार्गदर्शनाचे काम करत असतात. अहिल्यानगर जिल्हा सहकार समृद्धतेने नटलेला आहे त्यात काम करणाऱ्या व्यक्तींचे कार्य पुस्तक रूपाने प्रसिद्ध होणे हे विशेष असेही स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज याप्रसंगी बोलताना म्हणाले.

प्रारंभी रयत शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त हिंदी विषयाचे शिक्षक व संवत्सर येथील रहिवासी रंगनाथ किसन डहाळे सर यांनी प्रास्ताविक केले. वीरेंद्र मधुकर जोशी यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे व्यक्ती आणि विचार भाग एक ते तीन पुस्तक निर्मिती मागची भूमिका विषद केली. पुस्तक निर्मितीत मोलाची साथ देऊन आकर्षक सजावट करणाऱ्या सर्वेश ग्राफिक्सचे सर्वेश मयुर जोशी यांनी मुखपृष्ठ संकल्पना व पुस्तकाबद्दलच्या नावाची पार्श्वभूमी सांगितली.

याप्रसंगी प्रख्यात चित्रकार सत्यजित भरतकुमार उदावंत, गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स (नेवासा) चे मालक किरण रंगनाथ डहाळे, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्तकर्ते माधव उदागे, श्रीनिवास डहाळे, सौ. प्रमिला रंगनाथ डहाळे, श्री दत्त मंदिर संस्थान श्रीक्षेत्र देवगड येथील बाल कीर्तनकार, प्रवचनकार उपस्थित होते. शेवटी सार्थक वीरेंद्र जोशी यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!