Homeकोपरगावकामगार आणि व्यवस्थापन परिसराच्या प्रगतीचे जबाबदार घटक - कानवडे

कामगार आणि व्यवस्थापन परिसराच्या प्रगतीचे जबाबदार घटक – कानवडे

oplus_2

कोपरगांव :- माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी ग्रामिण अर्थकारणाबरोबरच शेतक-यांचे जीवन समृध्द करण्यांसाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना व त्यावर अवलंबुन असणारे अन्य उपपदार्थ, प्रकल्पांची यशस्वी उभारणी केली. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व कारखान्याचे युवाअध्यक्ष आमदार विवेक भैय्या कोल्हे यांनी कारखान्याच्या प्रगतीत भर घातली. कामगार आणि साखर कारखान्याचे व्यवस्थापन कोपरगांव पंचक्रोशीच्या प्रगतीचे जबाबदार घटक असल्याचे प्रतिपादन प्रभारी कार्यकारी संचालक तुळशीराम कानवडे यांनी केले.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या लेखा शाखेचे गणेश वाबळे, आण्णासाहेब मोरे व रासायनिक विभागाचे माधवराव कासार, अर्जुन शिलेदार प्रदीर्घ सेवेतुन निवृत्त झाल्याबददल त्यांचा शनिवारी सत्कार करण्यांत आला त्याप्रसंगी ते बोलत होते.

प्रारंभी साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी संजीवनीच्या प्रगतीची माहिती दिली. सहायक उपमुख्य लेखापाल प्रविण टेमगर यांनी प्रास्तविक केले. श्री. देवराम देवकर व चंद्रकांत जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सत्कारास उत्तर देतांना श्री. गणेश वाबळे, आण्णासाहेब मोरे, माधवराव कासार, अर्जुन शिलेदार म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे हे दुरदृष्टीचे नेतृत्व होते. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली काम करतांना अनेक नव-नविन गोष्टी शिकायला मिळाल्या. युवानेते आमदार विवेक कोल्हे यांनी आधुनिकीकरणाची कास धरत बदलत्या मुक्त अर्थव्यवस्थेत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या प्रत्येक विभागाचे संगणकीकरण करत काळानुरूप बदल केले. शेतकरी सभासदाबरोबरच सर्वच घटकांची आर्थीक क्रयशक्ती वाढविण्यांत मोलाचे हातभार लावले. शेवटी रावसाहेब होन यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!