
नाशिक प्रतिनिधी :-शिवविजय फाउंडेशन, भगूर जि. नाशिक या संस्थेच्यावतीने सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कृषी, सहकार, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, अध्यात्म, क्रीडा, सांकृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते या वर्षाचा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर गौरव पुरस्कार २०२६ सामाजिक कार्यकर्ते महेश मोतीलाल पाटील यांना सामाजिक कार्याबद्दल जाहीर झाला होता.

शिवविजय फाउंडेशन, भगूर जि- नाशिक या संस्थेच्या वतीने २९ जून २०२६ रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सावरकरांची जन्मभूमी असलेल्या भगूर जि नाशिक या गावात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर गौरव पुरस्कार सोहळ्याचे भव्यदिव्य आयोजन करण्यात आले होते या पुरस्कार सोहळ्यात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. विजयअप्पा करंजकर (शिवसेना उपनेते), तसेच मार्गदर्शक श्री. दिलीपजी फडके (अध्यक्ष, सार्वजनिक वाचनालय नाशिक/नाशिक एज्युकेशन सोसायटी नाशिक), श्री. संदीपजी मिटके (सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे विभाग नाशिक) आणि डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी (संचालक, साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर नाशिक) श्री. प्रमोद गंगाधर घुमरे (संस्थापक, शिवविजय फौंडेशन, भगूर), सौ. प्रतिभा गंगाधर घुमरे (माजी उपनगराध्यक्षा, मनपा) यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते महेश मोतीलाल पाटील व त्यांचे वडील मोतीलाल पाटील व आई बेबाबाई पाटील यांना स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल, मानाचा फेटा देऊन स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर गौरव पुरस्कार २०२६ या पुरस्काराने गौरविण्यात आले. या वेळी नाशिक शहरातील व भगूर गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

महेश पाटील यांनी समाजकार्याची पद्युत्तर पदवी घेतलेली असून गेल्या १३ वर्षापासून धुळे व नाशिक शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, सास्कृतिक, युवकल्याण, पर्यावरण, वृक्ष दिंडी, राष्ट्रीय एकात्मता, हुंडाबळी, एड्स जनजागृती, राष्ट्रीय सेवा योजना, स्काऊट गाईड शिबिरे, कैदी बांधवांसाठी धुळे कारागृहात गांधी विचार परीक्षा तसेच महामानवांच्या जीवनकार्यावर आधारित परीक्षांचे आयोजन अश्या अनेक कार्यक्रमाचे आयोजन, माहिती अधिकार कायद्यांतर्गत सरकारी कार्यालयातील अनागोंदी कारभारावर अंकुश ठेऊन अनेक गोर गरीब जनतेला सरकारी योजनाचा लाभ मिळवून दिला आहे, तसेच महाविद्यालयीन व किशोर वयीन युवक-युवती यांच्या साठी विविध समाज उपयोगी उपक्रमाचे आयोजन करून सामाजिक क्षेत्रात बहुमूल्य योगदान आहे.
महेश पाटील हे अनेक सामाजिक संस्था व संघटनांच्या कार्यकारणीवर असून संचालक महाराष्ट्र राज्य : नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा फोरम, दिल्ली, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष – माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र. उत्तर महाराष्ट्र प्रमुख – अखिल भारतीय कला साहित्य संस्कृती अकादमी, वर्धा. अध्यक्ष – धुळे महानगर युवा संसद, कार्याध्यक्ष – बेरोजगार क्रांती महासंघ, सरचिटणीस – ओ.बी.सी शिक्षक पालक संघटना, कार्यक्रम आयोजक – जिल्हा उद्योग केंद्र, जनसंपर्क अधिकारी – मी धुळेकर संघटना, सदस्य – अंधश्रद्धा निर्मुलन समिती, अश्या अनेक संस्थांवर कार्यरत आहेत.
महेश पाटील यांनी दिलेल्या सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांची अनेक सामाजिक संस्था व संघटनांनी दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र शासनाचा युवा पुरस्कार, राष्ट्रीय राजीव गांधी इंडिया गौरव पुरस्कार. वर्धा, राज्यस्तरीय आण्णाभाऊ साठे समाजसेवक पुरस्कार. छत्रपती संभाजी नगर, खान्देश सेवा कृतज्ञता पुरस्कार. धुळे, राज्यस्तरीय दक्ष नागरिक पुरस्कार. मुंबई, आदर्श केंद्र संचालक पुरस्कार. नाशिक, युवा मार्गदर्शन पुरस्कार. धुळे, युवा समाजरत्न पुरस्कार. नंदुरबार, राज्यस्तरीय दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार. मुंबई, राज्यस्तरीय महात्मा फुले स्मृती पुरस्कार, राज्यस्तरीय दर्पण रत्न पुरस्कार, मलकापूर, युवा चेतना पुरस्कार. जळगाव, युवारत्न पुरस्कार नाशिक, आदर्श केंद्र संचालक पुरस्कार, नाशिक अश्या अनेक संस्था संघटनांनी त्यांच्या कार्याची दाखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
महेश पाटील यांना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर गौरव पुरस्कार २०२६ मिळाल्याबद्दल भाजपचे वरिष्ठ नेते लक्ष्मनजी साहू, उद्योजक विजय वेदमुथा, उद्योजक निरंजन भतवाल, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे अध्यक्ष सुभाष बसवेकर, नैसर्गिक मानव अधिकार फोरमचे डायरेक्टर गोरख देवरे, साहेबराव वाघ, सुभाष दराडे, किरण धुमाळ यासह धुळे व नाशिक शहरातील सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.