Homeकोपरगावभुवनेश्वर येथे महाराष्ट्राचा डंका राष्ट्रीय सब-ज्युनिअर बेसबॉल स्पर्धेत मुलींना सुवर्ण, तर मुलांना...

भुवनेश्वर येथे महाराष्ट्राचा डंका राष्ट्रीय सब-ज्युनिअर बेसबॉल स्पर्धेत मुलींना सुवर्ण, तर मुलांना रौप्य पदक

विशेष पुरस्कारांवरही महाराष्ट्राचेच कु. अस्मि राऊत व यश शिंदे
उत्कृष्ट पिचर, तर आर्या चव्हाण उत्कृष्ट कॅचर

कोपरगाव : – भुवनेश्वर, ओरीसा येथील सुप्रसिध्द किट विद्यापीठाच्या मैदानावर पार पडलेल्या ३१ व्या राष्ट्रीय सब -ज्युनिअर बेसबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या मानाच्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने दिमाखात सुवर्णपदक पटकावले, तर मुलांच्या संघाने उपविजेतेपद मिळवत रौप्यपदकावर आपले नाव कोरले. २४ मे ते २९ मे या कालावधीत ही स्पर्धा पार पडली. यात वैयक्तिक पुरस्कारांमध्येही महाराष्ट्राने दबदबा राखला.

सांघिक यशासोबतच महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपल्या वैयक्तिक कौशल्याने संपूर्ण स्पर्धेचे लक्ष वेधून घेतले.

कु.अस्मि राऊत मुलींचा संघ स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी बेस्ट पिचर ऑफ द टूर्नामेंट, यश शिंदे मुलांच्या गटात उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करत बेस्ट पिचर ऑफ द टूर्नामेंट चा बहुमान पटकावला.तर आर्या चव्हाण मुलींचा संघ उत्कृष्ट कामगिरीसाठी, बेस्ट कॅचर ऑफ द टूर्नामेंट आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंच्या मार्गदर्शनाचा फायदा
दोन्ही संघांना राष्ट्रीय पातळीवर सज्ज करण्यासाठी महाराष्ट्राच्या तज्ज्ञ आणि अनुभवी प्रशिक्षकांनी घेतलेली मेहनत अत्यंत मोलाची ठरली.

मुलींच्या संघाला लाभलेल्या प्रशिक्षक आरती भगत आणि रिया आगवणे या दोन्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहेत. तर मुलांच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून अहिल्यानगर येथिल सोमनाथ सपकाळ आणि धनंजय शिरसाट हे स्वतः राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू आहेत.

या दिग्गज आणि अनुभवी खेळाडूंच्या मार्गदर्शनामुळे व रणनीतीमुळेच महाराष्ट्राच्या संघाने अंतिम फेरीपर्यंत दिमाखात मजल मारत हे घवघवीत यश संपादन केले.

महाराष्ट्र बेसबाँल असोसिएशनचे
अध्यक्ष डॉ. जितेंद्र आव्हाड तसेच सचिव श्री. राजेंद्र इखणकर यांनी दोन्ही संघांच्या या अभूतपूर्व कामगिरीचे विशेष कौतुक केले आहे.
महाराष्ट्राच्या मुला-मुलींनी राष्ट्रीय पातळीवर राज्याचा नावलौकिक वाढवला आहे. खेळाडूंची जिद्द, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पदक विजेत्या प्रशिक्षकांचे योग्य नियोजन यामुळेच हे सुवर्ण आणि रौप्य पदक आपण मिळवू शकलो.सर्व विजेत्या खेळाडूंचे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या मार्गदर्शकांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो अशा शब्दांत महाराष्ट्र बेसबाँल असोसिएशन चे महासचिव राजेंद्र इखणकर यानी खेळाडूंचे कौतुक केले.

महाराष्ट्राच्या या दुहेरी यशामुळे संपूर्ण राज्यातील क्रीडा क्षेत्रातून खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या संघामध्ये अहिल्यानगर येथिल अंजली दीपक खवले, रईसा जावेद शेख, आदित्य संदीप काळे या खेळाडुनी चांगली कामगिरी केली.
महाराष्ट्र बेसबाँल असोसिएशन महासचिव राजेंद्र इखणकर, उपाध्यक्ष इंद्रजित नितीनवार, टेक्निकल कमिटीचे अध्यक्ष अशोक सरोदे, राज्य असोसिएशन चे सहसचिव अहिल्यानगर जिल्हा बेसबाँल असोसिएशन चे सचिव श्री. मकरंद को-हाळकर, अहिल्यानगर जिल्हा बेसबाँल असोसिएशन चे अध्यक्ष अरुण चंद्रे, उपाध्यक्ष सुधिर चपळगावकर, सहसचिव कल्पेश भागवत, रिजवान पठाण, अहिल्यानगर आँलिपिक असोसिएशनचे सचिव शैलेश गवळी, महाराष्ट्र सायकलिंग असोचे संजय साठे, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शरदचंद्र धारुरकर, उपाध्यक्ष प्रदीप साखरे,आदीनी या खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!