
कोपरगांव : – तालुक्यातील मळेगांवथडी येथील सामाजिक कार्यकर्ते व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी कर्मचारी राधाकिसन भिवराव दवंगे (६६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या माध्यमांतुन कै. राधाकिसन दवंगे यांनी तालुक्यातील आदिवासी घटकासाठीच्या शासनस्तरावर योजनांची पुरेपुर अंमलबजावणी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले होते. १९७५ मध्ये आणिबाणी काळात त्यांनी कोपरगांवात निदर्शने केली होती म्हणून त्यांना विसापुरच्या कारागृहात ठेवण्यांत आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या सहकार्याने मिसाबंदी अंतर्गत राज्यस्तरावर अशा व्यक्तीसाठी मानधन सुरू केले होते त्याचा लाभ कै. राधाकिसन दवंगे यांना झाला होता त्याचबरोबर भाजपा व अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत त्यांचा अलिकडेच सत्कारही झाला होता. त्यांच्या अकाली निधनाने अनेकांनी हळहळ व्यक्त केली.