
कोपरगाव :- उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षेत तब्बल दोनशे अठ्ठावीस विद्यार्थी पात्र झाले असून. या शिष्यवृत्ती परिक्षेत राज्यपातळीवर आपले वर्चस्व कायम टिकवून ठेवण्यात आत्मा मालिक सेमी इंग्लीश मिडीयम गुरूकुलाच्या विद्यार्थ्यांना यश आले असून, राज्य पातळीवर आपला झेंडा फडकविला आहे.
याबाबत माहिती देताना प्राचार्य निरंजन डांगे म्हणाले, पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये 97 विद्यार्थ्यांनी 200 हून अधिक , 72 विद्यार्थ्यांनी 210 हून अधिक तर 54 विद्यार्थ्यांनी 220 हून अधिक गुण मिळविले.
यामध्ये घनश्याम ढेपे 276, श्रेयश धावडे 260, शिवम जाधव 258, साहिल पवार 256, श्रीकांत कोटकर 254, प्रथमेश सांगळे 252, गितेश उधान 252, कृष्णा धुमाळ 250, स्वरा लांडगे 250, आयुष वाळुंज 250 गुण प्राप्त केले.
या विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख सचिन डांगे, अनिल सोनवणे, बाळकृष्ण दौंड, रवींद्र देठे, मिना नरवडे, रमेश कालेकर, तसेच पर्यवेक्षक गणेश रासने, नयना आदमाने, सुनील पाटील, नितीन अनाप आदिंचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब गोरडे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदीपकुमार भंडारी, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे, मीरा पटेल आदिंनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
नंदकुमार सुर्यवंशी(अध्यक्ष विश्वात्मक, जंगली महाराज आश्रम ट्रस्ट) : – शिष्यवृत्ती परिक्षेत आत्मा मालिक गुरूकूलचे विद्यार्थी राज्यात आघाडीवर असतात याची प्रचिती यंदाही आली. त्यामागे शिक्षकांची मेहनत आणि विद्यार्थ्यांचे परिश्रम कारणीभूत आहेत. आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम राज्यात सातत्याने अव्वल कामगिरी करते आहे. हे आत्मा मालिक पॅटर्नचे यश आहे.