
कोपरगाव : – कोपरगाव शहर व ग्रामीण परिसरात सद्यस्थितीत बेकायदेशीर व अवैध धंद्यांचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. दिवसेंदिवस या अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचे मनोबल वाढले असून कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशा अवैध धंद्यांवर येत्या सात दिवसात तात्काळ कार्यवाही करून कायमस्वरूपी तात्काळ बंद करण्याची मागणी मा. उध्दव बाळासाहेब ठाकरे कोपरगाव सेनेच्या वतीने कोपरगाव पोलीस स्टेशनचे पी आय यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

यावेळी शिवसेना शहर प्रमुख गगन हाड़ा, तालुकाप्रमुख श्रीरंग चांदगुड़े, उपजिल्हाप्रमुख संजय दंडवते, शेतकरी सेना तालुकाप्रमुख धर्मा जावले, युवासेना तालुकाप्रमुख विजय गोर्डे, विधानसभाप्रमुख महेश कुलकर्णी, भावेश थोरात, विकास गाड़े, नंदू निकम, निखिल कंक्राळे, आबासाहेब पवार, पियूष सैदाने, राहुल हाड़ा, विनय टाक, ओम पवार, शांतनु चावरे, वरुण टाक, याकूब शेख, कुणाल चावरे, शिवसैनिक युवासैनिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

आपल्या निवेदनात पुढे म्हटले कि, मटका व जुगाराचे जाळे घरोघरी आणि गल्लीबोळांत पसरले आहे. यामुळे गोरगरीब, सर्वसामान्य व तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात या व्यसनाच्या आहारी जाऊन आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत आहे. कौटुंबिक वाद, गृहकलह आणि सामाजिक अस्वास्थ्य यात कमालीची वाढ झाली आहे.अशा प्रकारची अवैध कृत्ये ही दिवसाढवळ्या आणि उघडपणे सुरू असल्याने, पोलीस प्रशासनाच्या निष्क्रीयतेबद्दल सर्वसामान्य जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होत आहे. असा संशय व्यक्त केला जात आहे की, या अवैध धंद्यांना प्रशासकीय अथवा राजकीय आश्रय लाभलेला आहे कि काय ? हे अवैध व्यवसाय करणारे घटक पोलीस प्रशासनाला हप्ते दिले जातात असा उघड प्रचार करून प्रशासनाची प्रतिमा मलीन करत आहेत. अशा प्रवृत्ती करणाऱ्यांवर तात्काळ व कायम स्वरूपी कार्यवाही करुन पूर्णतः बंद करावी.

पुढे, पूर्वी लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने व पोलीस प्रशासनाच्या धडक कारवाईमुळे काही काळ हे अवैध धंदे बंद झाले होते. परंतु पुन्हा एकदा हे मटका किंग” व असामाजिक तत्वे सक्रिय झाली आहेत. त्यामुळे मटक्यामध्ये पैसे हरल्यानंतर घरी काय सांगणार म्हणुन सर्रास दिवसाढवळ्या चोरी करणे ही दिवसेदिवस गुन्हेगारी वाढत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कोपरगावच्या वतीने दिलेल्या निवेदनातील प्रमुख मागण्या – कोपरगाव शहर व ग्रामीण भागातील सर्व प्रकारचे अवैध मटका व जुगाराचे अड्डे तात्काळ उद्धवस्त करून संबंधित मुख्य सूत्रधारांवर कठोर कायदेशीर कार्यवाई करण्यात यावी, पारदर्शकता व जनतेचा विश्वास पोलीस प्रशासनाने निष्पक्ष व धडक कारवाई करून स्वतःची प्रतिमा जपावी आणि जनतेचा विश्वास पुनस्थापित करावा, लोकप्रतिनिधींचे स्पष्टीकरण स्थानिक लोकप्रतिनिधींनी (आमदार व खासदार) देखील कोणत्याही बेकायदेशीर धंद्याला पाठिंबा नसल्याचे जाहीर करून कारवाईची स्पष्ट मागणी करावी. अशी निवेदन कर्त्यांची रास्त मागणी येत्या सात दिवसात संबंधीतांनी पूर्ण करावी. अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पुढच्या 7 दिवसानंतर अहिल्यानगरचे एस.पी. मुमाका सुर्दशन साहेब यांचेकडे तीव्र स्वरूपाचे आंदोलन तारीख जाहीर करण्यात येईल. त्यानंतर उद्भवणाऱ्या सर्व कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची राहील. आपल्या तात्काळ व धडक कायदेशीर कारवाईची अपेक्षा व्यक्त करत आहे.