
कोपरगाव :-रंगरेषा हीच आपल्या जीवनाची आशा आहे असे प्रतिपादन कॅमलिन आर्ट क्रिएशनच्या प्रशिक्षक कोमल इंदुलकर उर्फ ठोंबरे यांनी केले.

तालुक्यातील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांसाठी एक दिवशीय चित्र रंगवा कार्यशाळा सोमवारी घेण्यात आली त्याप्रसंगी त्याचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. प्रारंभी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे व कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे कामगारांच्या प्रत्येक अडीअडचणीत सातत्याने मदत करतात व आजवर राबवलेल्या उपक्रमाची माहिती प्रभारी कार्यकारी संचालक तुळशीराम कानवडे यांनी दिलीप. सौ. रोहिणी होन यांनी कॅमलिन आर्ट क्रिएशनच्या कार्यशाळेत काय साध्य केले जाते याबाबतची सखोल माहिती दिली. कोपरगाव तालुका महिला बचत गटाच्या अध्यक्ष सौ. रेणुका कोल्हे यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील शालेय विद्यार्थी, कुमारिका, भगिनी, महिला, विद्यार्थी, आदी घटकांसाठी चित्र रंगवा उपक्रम घेऊन त्यांच्या मनावरील ताण हलका करण्याचा प्रयत्न केला आहे असेही सौ. होन म्हणाल्या.
सौ. कोमल इंदुलकर उर्फ ठोंबरे पुढे म्हणाल्या की, आतापर्यंत सुमारे दहा हजार व्यक्तींपर्यंत कॅमलिन आर्ट क्रिएशन पोहोचवण्यात आले आहे. दैनंदिन कामकाजात कामगार थकला जातो, त्याच्या मनावरील ताण हलका व्हावा यासाठी चित्र रंग अल्हाददायक वातावरण निर्मिती करण्यात प्रमुख भूमिका बजावत असतात. ब्रश, कागद, पेन्सिल, याचा संबंध शाळा संपल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात क्वचितच येतात ही आठवण यानिमित्ताने अनेकांनी बोलून दाखवली. शुभ लाभ या कलाकृती कामगारांना रंगविण्यासाठी देण्यात आल्या होत्या. त्यावर आकर्षक नक्षीकाम चिटकवण्याचा टास्क ही दिला होता, सर्व कामगारांनी पूर्ण केला. लक्ष्मण घोरपडे यांनी स्वाध्याय परिवार आणि मनुष्य गौरव दिनानिमित्त उपस्थित कामगारांना माहिती दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एच. आर. विभागाच्या सौ. देवकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कामगार कल्याण अधिकारी एस. सी. चिने यांनी सूत्रसंचालन केले. असिफ शेख यांनी आभार मानले. चंद्रकांत जाधव यांनी अनुभव सांगितले. आरोही ठोंबरे हिने सहभागी कामगारांना रंग पुरविले शेवटी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.