
संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव,
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचा अजब कारभार
ग्राहकांना वीज पुरवठा करत असताना ग्राहकांना येणाऱ्या अडचणीच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात तक्रार निवारण कक्षाची उभारणी केली मात्र तासंतास फोन करून देखील फोन घ्यायलाच कोणी नाही तर मग या तक्रार स्वीकारणाराची तक्रार करायची कोणाकडे याचे उत्तर वीज वितरण कंपनीचे अधिकारी देतील का?असा प्रश्न लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्षअँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला.
काल दि.२१मे२२दुपार नंतर कोपरगाव शहरातील बऱ्याच भागातील लाईट गायब झाली साधारण सहा वाजता लाईट आली मात्र अनेक ठिकाणी लाईट नसल्याने वीज वितरण कार्यलयातील तक्रार निवारण कक्षात फोन लावला,वारंवार फोन करून देखील कोणीच फोन उचलत नाही म्हटल्यावर मी थेट वीज वितरण कार्यालय गाठले मात्र त्या ठिकाणी ग्राहकांची तक्रार स्वीकारणारे कर्मचारीच जागेवर नव्हता,म्हणून मी मुख्य कार्यलयात गेलो असता शहर विभागातील सर्व विद्युत अभियंत्यांची दालने सताड उघडी होती त्याठिकाणी लाईट,पंखे जोरात सुरू होते मात्र कार्यालयात एकही अधिकारी,वायरमन,शिपाई हजर नव्हते अशावेळी द्यायची कुणाकडे हाच प्रश्न उभा राहीला, तक्रार करण्यासाठी देण्यात आलेला फोन जोर जोरात वाजत होता मात्र तो उचलायला कोणी हजर नव्हते.मग अर्धा तास मी स्वतःअनेक तक्रारीचे कॉल स्वीकारून फोन अटेंड केले या वेळी शहरातील विविध भागातून वीज पुरवठा खंडित असल्याच्या तक्रारी ऐकून घेतल्या वीज वितरण कार्यालयाकडून दर महिन्याला वीज बिल पाठवले जातात,चार आठ दिवस वीज बिल उशिरा भरले तर दंड व व्याज वसूल केले जाते मात्र ग्राहकांच्या तक्रारी ऐकून घ्यायला कार्यालयातील अधिकाऱ्यांना वेळ नाही,सद्या वादळ वाऱ्याचे दिवस आहे अशात एखादी अनुचित घटना घडून जीवित हानी झाली तर तक्रार करून देखील वेळेवर मदत मिळणार नाही याची संबधितांनी दखल घ्यावी.यापूर्वी कोपरगाव शहरातील वीज वितरण कंपनीच्या बेजबाबदार वागण्यामुळे ग्राहकांनी कार्यालयाची तोडफोड केली होती वीज वितरण कंपनीच्या अधिकारी यांनी याची गंभीर दखल घेऊन संबधीत तक्रार स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर वेळीच कारवाई करावी असे या पत्रकात म्हटले आहे.