Homeकोपरगावगोदावरी नदीकाठच्या हिंगणी येथील वाड्याची देखभाल व दुरुस्ती व्हावी

गोदावरी नदीकाठच्या हिंगणी येथील वाड्याची देखभाल व दुरुस्ती व्हावी

संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव, (दि.२२मे२२)

    उत्तर पेशवाईतील पराक्रमी पेशवे ज्यांनी अटकेपार झेंडा लावला ते राघोबादादा पेशवे व त्यांच्या पत्नी सौ आनंदीबाई कपट कुटील कारस्थानी होत्या ध चा मा करून राजकारण करणार्या म्हणून उभयतांना कोपरगाव येथे नजरकैदेत ठेवण्यात आले होते

कोपरगाव शहरात (जुने गावठाण) गोदावरी नदीच्या काठी राघोबादादा पेशव्यांनी भव्य ऐसपैस वाडा बांधला होता त्यात त्यांनी कचेरी(ऑफिस),कारागृह, कोठार,तळघर आदि सुविधा निर्माण केल्या होत्या.
असे म्हणतात की या वाड्यातून बेट भागातील गुरू शुक्राचार्य मंदिरापर्यंत नदीखालून भुयारी मार्ग होता कारण राघोबादादा पेशवे

निस्सीम भक्त होते मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी केला होता.सदरचा वाडा इतिहास पुरातत्व खात्याच्या ताब्यात असून मधल्या काळात काही डागडुजी करण्यात आली आहे, परंतु संथगतीने.
राघोबादादा पेशवे यांचा दुसरा वाडा कोपरगाव शहरापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या हिंगणी येथील गोदावरी नदीच्या काठी तीन भिंती उभ्या आहे तो आता जिर्णोद्धार होण्याची प्रतीक्षा करतआहे, वाड्याची भिंत बैलगाडी जाईल इतका वरचा भाग रुंद आहे परंतु त्यावर आता झाडी उगवण्यास सुरवात झाली आहे,भिंतीचे वरचे दगड(चिरे)ढासळण्यास सुरवात झाली आहे वेळीच डागडुजी झाली नाही तर लोक ढासळलेले दगड व मुद्दाम ढिले करून काढून नेण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून साठी सर्व इतिहास प्रेमींना वाटते की,सदरच्या वाड्याची देखभाल व दुरुस्ती केली जावी.सुशांत घोडके आणि मित्र परीवाराने समाधिस्थान साफसफाई करून पुजा अर्चा केली होती, तेथे नेहमी पर्यटकांची वर्दळ असते त्याचप्रमाणे महाविद्यालयातील विद्यार्थी, शालेय विद्यार्थी या स्थानाला भेट देऊन पाहणी करण्यासाठी येत असतात.
गोदावरी नदीच्या पश्चिम तीरावर असलेला हा वाडा तीन भिंतींचा दिसून येतो परंतु नदीच्या पूर्वेला चांदगवहाण बाजूला असलेल्या वाड्याची माहिती फारशी कोणाला नाही वार्ताहर व इतिहास प्रेमी महेश जोशी यांनी हि माहिती शोधून काढली होती नदीच्या काठावर राघोबादादा पेशव्यांनी राहण्यासाठी वाडा बांधला होता तेथे घोड्यांच्या पागा धान्याची कोठारे व देविचे मंदिर होते परीसरातील शेतकरी तेथे गेल्या काही वर्षांपूर्वी दिवाबत्ती करत,परंतु कालौघात काही हावरट लोकांनी काही अपेक्षेने भिंती कोरल्या तर काहींनी पांढरे मातीसाठी खोदकाम केले तर महापुरामुळे भिंतीचा काही भाग वाहून गेला,आता आहे तो वाडा जतन व्हायला हवा असे अभ्यासकांचे मत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!