
कोपरगांव :- तालुक्यातील गोधेगांव नं. १ सोसायटीच्या अध्यश्वपदी कोल्हे गटाच्या मंगलबाई सुभाष कानडे तर उपाध्यक्षपदी श्रीमती. रतनबाई सखाहरी साळुंके यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीमुळे संस्थेच्या कारभारात महिला नेतृत्वाला संधी मिळाली आहे. जिल्हा बँकेचे संचालक व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, आमदार विवेक कोल्हे, माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांनी नवनिर्वाचित पदाधिका-यांचे अभिनंदन केले आहे. सहायक निबंधक कार्यालयाचे एस. पी. रूद्राक्ष यांनी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन काम पाहिले.

सौ. मंगलबाई सुभाष कानडे यांच्या नावाची सुचना संचालक बाबासाहेब शामराव कोळसे यांनी मांडली तर त्यास वाल्मीक भिकाजी सोळसे यांनी अनुमोदन दिले. तर उपाध्यक्षपदासाठी श्रीमती रतनबाई सखाहरी साळुंके यांच्या नावाची सुचना संचालक बाळासाहेब मारूती बोरकर यांनी दिली तर त्यास सुरेश नारायण कानडे यांनी अनुमोदन दिले. याप्रसंगी संचालक सर्वश्री. सुभाष नारायण कानडे, अशोक माधवराव रांधवणे, प्रमोद माधवराव रांधवणे, विनायक पंढरीनाथ उर्कीडे, जानकीराम विठठल धने, विठठल बळवंत शिरसाठ, बाजार समितीचे संचालक माधवराव सहादु रांधवणे, सुधाकर शिरसाठ, बाळासाहेब सखाहरी साळुंके, रविंद्र अर्जुन रांधवणे यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिका-यांचा यावेळी सत्कार करण्यांत आला. सत्कारास उत्तर देतांना सौ. मंगलबाई सुभाष कानडे म्हणाल्या की, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांची बिनविरोध निवड झाल्याबददल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडुन त्यांच्या मार्गदर्शनांखाली सभासद शेतक-यांसाठी असणा-या विविध योजनांची अंमलबजावणी करून त्यांचा विकास साधु. माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या सर्वागिण विकासाला सर्वोच्य प्राधान्य देवु. सहायक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून संस्थेचे सचिव आण्णासाहेब निकम यांनी काम पाहिले. सुत्रसंचलन रविंद्र रांधवणे यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.