Homeकोपरगावमहाराष्ट्र पोलीसांच्या समस्याबाबत मा.उच्च न्यायालयात दोन वर्षापासून याचिका दाखल मात्र शासनाचे याकडे...

महाराष्ट्र पोलीसांच्या समस्याबाबत मा.उच्च न्यायालयात दोन वर्षापासून याचिका दाखल मात्र शासनाचे याकडे दुर्लक्ष,न्यायालयाने नाराजी व्यक्त करत दिले आदेश

संपादक -राजेंद्र तासकर

         महाराष्ट्र पोलीस यांच्या समस्या मांडत संजय भास्करराव काळे यांनी मुंबई येथे उच्च न्यायालयात दोन वर्षापूर्वी याचिका दाखल केली परंतु शासनाने त्यामध्ये आपले म्हणणे दाखल केले नाही.

दाखल याचिकेतील मागण्या : – पोलीसांना अद्ययावत वाहने द्यावी,पोलीसांना अद्यावत हत्यारे द्यावी,पोलीसांची संख्या लोक संख्येच्या प्रमाणात असावी, पोलीस स्टेशन अद्ययावत सर्व सोईनुरूप असावे,संगणक प्रणाली अद्ययावत असावी, पोलीसांचे कामाचे तास व सुट्ट्या निश्चित असाव्या,पोलीसांना घरकुले पुरवण्यात यावेत व ते सुखसोईचे असावे,पोलीसांची वारंवार आरोग्य तपासणी व्हावी
पोलीसांनी केलेल्या अन अकाऊंटेड कामाचे मोजमाप करावे,पोलीस यंत्रणेचे आधुनिकी करणासाठी शासनाने प्रयत्न करावे.त्यांना अद्ययावत ट्रेनिंग वरचेवर द्यावे.
अशा अनेक मागण्यांसाठी याचिका दाखल केली होती. शासनाने दोन वर्षात साधे म्हणणे देण्याची तसदी घेतली नाही,मा. उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करत शासनाला आपले म्हणणे मांडण्यासाठी चार आठवड्याची अंतिम मुदत दिली आहे.
याचिका कर्त्याचे वतीने ॲड.सतिष तळेकर ॲड.प्रज्ञा तळेकर ॲड.अजिंक्य काळे यांनी काम पाहिलें.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!