
लक्ष्मीबाई मंगल कार्यालय येसगांव येथे ब्राम्हणगाव परिसरातील नवनिर्वाचित सहकारी सोसायटी व ग्रामपंचायत सदस्यांचा जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संपादक – राजेंद्र तासकर
तंत्रज्ञान दिवसेंदिवस बदलत आहे,जगाची वाटचाल आधुनिकतेकडे सुरू आहे, प्रवासासाठी इलेक्ट्रीकवर चालणारी वाहने बाजारात येवु लागली आहेत,ग्रामिण अर्थकारणात मोलाचा सहभाग देणा-या सहकारी सोसायटया शेती कर्ज वितरीत करीत आहेत त्याचबरोबर इलेक्ट्रीक वाहन घेण्यासाठी कर्जपुरवठा व्हावा अशी मागणी असंख्य सभासद शेतकऱ्यांनी केली असून त्याबाबत कर्ज पुरवठा करून त्यातुन उत्पन्नाचे साधन निर्माण होवु शकेल काय असा पर्याय समोर येत असुन भविष्यात त्यादृष्टीने जाणिवपुर्वक प्रयत्न करू असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी केले.
तालुक्यातील ब्राम्हणगांव परिसरातील नवनिर्वाचित सहकारी सोसायटी व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार शुक्रवारी लक्ष्मीबाई मंगल कार्यालय येसगांव येथे करण्यांत आला त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.
प्रारंभी भाजपाचे तालुका सरचिटणीस दिपक चौधरी यांनी प्रास्तविक केले.भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, रविंद्र आगवण,चंद्रभान रोहोम यांची यावेळी भाषणे झाली.
याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे संचालक साहेबराव कदम,निवृत्ती बनकर,विश्वासराव महाले,वेणुनाथ बोळीज,सुनिल देवकर,नवनाथ आगवण,बापू सुराळकर,दिनेश कोल्हे,दगुराव चौधरी,अतुल सुराळकर,गोरख आहेर,भिमराव भुसे,शिवाजीराव कदम,दगडु दरेकर,सुभाष गायकवाड,सुकदेव सोनवणे, अशोक येवले,चंद्रकांत देवकर, रामदास देवकर,संदिप देवकर, निलेश देवकर,अंबादास देवकर, बाळासाहेब कदम,वाल्मीक भास्कर,अरूण भिंगारे,संदिप कदम,गणेश बोठे,ऋषीकेश कदम,गणेश भिंगारे,निलेश कदम, अनुराग येवले,बाळासाहेब भिंगारे,सुभाष शिंदे,रामदास मोरे, बाळनाथ जोरवर,धोंडीबा सांगळे, जयराम सांगळे,बद्रीनाथ सांगळे, शालीनी सांगळे,प्रभाकर आव्हाड, रमेश उगले,संतोष दवंगे,धनंजय बडदे,कांतीलाल खोंड,मुकेश चंद्रे, राजकुमार दवंगे,किरण उगले, अनिता उगले,भानुदास भवर, यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी सहकारी,सरपंच, उपसरपंच,सोसायटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष,संचालक,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
श्री.विवेकभैय्या कोल्हे पुढे म्हणाले की,माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे,संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव मतदारसंघाच्या प्रलंबित समस्यांचा कृती आराखडा तयार करून त्याचे विविध प्रस्ताव शासन दरबारी सादर करत रस्ते, वीज,पाणी आरोग्य आदि विकास कामांसाठी कोटयावधी रूपयांचा निधी आणुन ती मार्गी लावली आहेत.
संजीवनी उद्योग समुहाने राज्यात सर्वप्रथम पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहिम धडकपणे हाती घेत त्यातुन भुगर्भातील जलसाठा वाढविण्यांवर भर दिला गोदावरी कालवे सिंचन पाण्याच्या समस्या प्रत्येक बैठकीत मांडुन त्याची सोडवणुक केली,गोदावरी खोरे हे तुटीचे असतांनाही त्यावर बिगरसिंचन पाण्यांचे आरक्षण मोठया प्रमाणांत टाकले जात आहे त्यामुळे येथील शेती पाटपाण्याची अवस्था गंभीर होत चालली आहे.तुटीच्या खोऱ्यात पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेला आणण्यासंदर्भात माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचे स्वप्न लवकरच साकार होईल यासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यासह जलक्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचा पाठपुरावा सुरू आहे.
सोसायटयामार्फत कृषि पतपुरवठा मोठया प्रमाणात केला जातो त्याच्या वसुलीसाठी सचिव व संबंधीत संचालकांनी प्रयत्न करावेत.त्या थकबाकीत गेल्या तर त्यातुन छोटया छोटया घटकांना त्याचा फटका बसतो. सहकारी संस्थांनी आर्थीक उत्पन्नाचे स्त्रोत शोधुन त्यावर काम करावे त्यातुन स्थानिक नेतृत्वाचा विकास होतो.केंद्र व राज्य शासनांच्या विविध योजना थेट ग्रामपंचायत स्तरावर येत असल्याने सरपंच,उपसरपंच, सदस्यांनी आपापल्या गावांची कामगिरी नावलौकीकास्पद कशी होईल यासाठी प्रयत्न करावे असेही ते म्हणाले.भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी आभार मानले.