
संपादक -राजेंद्र तासकर
गेल्या अडीच वर्षात विरोधकांनी कोपरगांवात फक्त विकासाच्या बढाया मारल्या मतदार संघात असंख्य प्रश्न प्रलंबित असतांना त्याची कधीही कोठेही वाच्यता झाली नाही आता सत्ताबदलानंतर विरोधक याच प्रलंबित प्रश्नावर आंदोलनासह रस्त्यावर उतरण्याची भाषा करतील अशी टिका जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक भैय्या कोल्हे यांनी केली.आपली व कार्यकर्त्यांची बांधीलकी सर्वसामान्यांच्या घटकांशी आहे तेव्हा सर्वांनी तोच वसा कायम ठेवुन कार्यरत रहावे असेही ते म्हणाले.
तालुक्यातील संवत्सर जिल्हा परिषद गटातील नवनिर्वाचित सहकारी सोसायटी व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार दहेगांव बोलका येथीलद्वारकामाई लॉन्स येथे सोमवारी झाला त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.कार्यकर्त्यांना घडवुन प्रश्नांची सोडवणुक करणारे व्यासपिठ म्हणजे माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे होते.त्यांचा समाजकारणातुन राजकारणाचा विकासाचा संघर्ष सर्वांना परिचित आहे.युवानेते विवेक भैय्या कोल्हे यांनी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगांव औद्योगिक वसाहत व जिल्हा बँकेच्या माध्यमांतुन तालुक्याची कमान सांभाळून काम करत आहे वेळ त्यांच्यासाठी वाट पहात आहे पण विकासाची गती त्यांना वाढवावी लागेल असे माजी सभापती मच्छिंद्र टेके प्रास्तविक करतांना म्हणाले. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
याप्रसंगी सर्वश्री.संतोष देशमुख, यादवराव संवत्सरकर, उत्तमराव चरमळ,बबनराव निकम,केशवराव भवर,महेश परजणे यांची भाषणे झाली.
श्री.विवेकभैय्या कोल्हे पुढे म्हणाले की,राज्यात मुख्यमंत्री म्हणून सेनेचे एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्रीपदी भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेवुन पहिल्याच मंत्रीमंडळाच्या बैठकीत पश्चिमेचे पाणी पुर्वेला वळविण्याचा निर्णय घेवुन त्याबाबतच्या सर्व निवीदा पुर्ण करून अहमदनगर नाशिकसह मराठवाडयाचा बिकट झालेला पाटपाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यांचे सुतोवाच करून एक प्रकारे माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांच्या स्वप्नपुर्तीच्या दृष्टीने पाउल टाकले आहे त्याबददल नव्या सरकारचे विशेष अभिनंदन केले.सहकारी सोसायटयांना ५ लाख रूपयापर्यंत बिनव्याजी कर्जपुरवठा व्हावा म्हणून असंख्य सभासदांची मागणी आहे त्याबाबत जिल्हा बँक पातळीवर प्रयत्न करू असेही ते म्हणाले.
याप्रसंगी सर्वश्री.विश्वासराव महाले,ज्ञानेश्वर परजणे,सतिष आव्हाड,फकिरराव बोरनारे, बापूसाहेब बारहाते,माजी सभापती मच्छिंद्र केकाण,विलास कुलकर्णी,कैलास संवत्सरकर, माधवराव रांधवणे,सयराम कोळसे,राजेंद्र लोणारी,रामदास शिंदे,वैभव गिरमे,वसंतराव देशमुख,मुरलीधर वाकचौरे, बाबासाहेब खिलारी,रामभाऊ कासार,भिमा संवत्सरकर,दिलीप शिंदे,सतिष केकाण,बाळासाहेब केकाण,मधुकर उगले,प्रशांत आढाव,सतिश रानोडे,अंकुश कु-हे,नारायण लोहकणे, आण्णासाहेब लोहकणे,शेखर रक्ताटे,रामभाउ रक्ताटे,उत्तमराव चव्हाण,प्रकाश भाकरे, बाळासाहेब काजळे,विशाल गोर्डे,प्रशांत संत,अनिल गोरे, विष्णुपंत क्षीरसागर,गोरख दुपके, हेमंत निकम,रेवण निकम, वाल्मीकराव भोकरे,शिवाजीराव जाधव,रावसाहेब जाधव, दादासाहेब सूंबे,रविंद्र मलिक, रविंद्र देशमुख,सुभाषराव कानडे, सुभाष शिरसाठ,प्रकाश शिंदे, परशराम शिंदे,लक्ष्मण शिंदे,गोरख शिंदे,सुदामराव कर्पे,किसनराव गव्हाळे,रविकांत भवर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, आजी माजी संचालक,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
सुत्रसंचलन भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी केले.शेवटी त्रंबकराव सरोदे यांनी आभार मानले.