Homeकोपरगावगोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा अतिवृष्टीमुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता -तहसिलदार...

गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा अतिवृष्टीमुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता -तहसिलदार विजय बोरुडे साहेब

संपादक – राजेंद्र तासकर
अहमदनगर जिल्हयातील नागरीकांना कळविणेत येते की, भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त सूचनेनुसार दि.11/ 07/ 2022 से 14/07/2022 या कालावधीत अहमदनगर जिल्हयामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. आजपर्यंत अहमदनगर जिल्हयात 166.3 मि.मी. 37.1% (जून ते सप्टेंबर सरासरी पर्जन्याच्या पर्जन्यमान झालेले आहे.
दि.11/07/2022 रोजी दुपारी 12.00 वा.अहमदनगर जिल्हयातून वाहणा-या गोदावरी नदीस नाशिक जिल्हयातील विविध धरणाव्दारे सोडलेल्या विसर्गामुळे नांदुरमधमेश्वर बंधा-यातून 27.868 क्युसेस तसेच भिमा नदीस पुणे जिल्हयात झालेल्या पर्जन्यमानामुळे दौड पुल येथे 23.819 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यास धरणाच्या पाणीसाठयात वाढ होऊन पर्यायाने नदीपात्रातील विसर्गात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे जिल्हयातील तमाम नागरिकांना आवाहन करण्यात येते कि,स्थानिक प्रशासनाव्दारे दिलेल्या सुचनांचे पालन कराये.सखल भागात राहणा-या नागरीकांना तातडीने सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. नदी,ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासुन तसेच ओढे व नाले यापासुन दुर रहावे व सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये.पूर पाहण्यासाठी गर्दी करु नये. जुनाट / मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये.अतिवृष्टीमुळेभूसख्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते.त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहण्या-या लोकांनी दक्षता घ्यावी वेळीच सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे.धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी.नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरु नये.अचानक नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यास जिवीतास धोका उदभवू शकतो.धोकादायक ठिकाणी चद्र अथवा उतरु नये,धोकादायक ठिकाणी सेल्फी (Selfie) काढू नये.मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्षीत ठिकाणी आश्रय घ्यावा, आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा.तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष,जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दुरध्वनी क्र. 1077 (टोल फ्री). 0241-2323844 या 2356940 वर संपर्क साधावा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!