Homeकोपरगावकोपरगांव शहर भाजपा उपाध्यक्षपदी इलियासभाई खाटीक यांची निवड

कोपरगांव शहर भाजपा उपाध्यक्षपदी इलियासभाई खाटीक यांची निवड

कोपरगांव शहर भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्षपदी मुस्लीम समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते इलियासभाई खाटीक यांची शुक्रवारी निवड करण्यांत आली त्याबददल त्यांचा संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी नियुक्तीपत्र देवून सत्कार केला

संपादक – राजेंद्र तासकर

        कोपरगांव शहर भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्षपदी मुस्लीम समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते इलियासभाई खाटीक यांची शुक्रवारी निवड करण्यांत आली त्याबददल त्यांचा संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी नियुक्तीपत्र देवून सत्कार केला. 
     याबददल त्यांचे अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान, भाजपाचे शहराध्यक्ष दत्ता काले, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अविनाश पाठक,लियाकतभाई सय्यद, खालिकभाई कुरेशी,फकिर महंमद पहिलवान,सतिष रानडे, मुस्तकीम शेख,स्वप्नील निखाडे, रविंद्र रोहमारे,अनिल कथले, अनिल कांबळे,दिपक वाजे, कादरभाई खाटीक,युसुफभाई खाटीक,तौसिफ खाटीक,रियाज खाटीक,जमिर पठाण,वसिम खाटीक,इम्रान खाटीक,वसिम वहाब खाटीक,महंमद खाटीक आदिंनी अभिनंदन केले. 
       सत्कारास उत्तर देतांना इलियासभाई खाटीक म्हणाले की,भाजपाच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलता कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यांचे नवनिर्वाचित अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी शहरात पक्ष संघटन वाढीसाठी सातत्याने प्रयत्न केले असुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना तळागाळातील वंचित घटकापर्यंत व मुस्लीम बांधवापर्यंत पोहोचवुन भारतीय जनता पक्षाची ताकद वाढविण्याचा जाणिवपुर्वक प्रयत्न करू.शेवटी फकिर महंमद पहिलवान यांनी आभार मानले. 

.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!