Homeकोपरगावगोधेगावात काळे गटाला भगदाड, बिपीनदादा कोल्हे यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

गोधेगावात काळे गटाला भगदाड, बिपीनदादा कोल्हे यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

संपादक – राजेंद्र तासकर

    कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथील काळे गटातील अनेक युवा कार्यकर्त्यांनी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. 

माजी मंत्री सहकारमहर्षी स्व.शंकरराव कोल्हे यांनी कोपरगाव तालुक्यात जनहिताची अनेक कामे करून आपला ठसा उमटवला आहे. तालुक्यात स्व. कोल्हेसाहेब यांना मानणारा मोठा वर्ग आहे.संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे,माजी आमदार स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष,युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या धोरणामुळे गावागावातील अनेक कार्यकर्ते त्यांच्याशी जोडले जात आहेत.यापूर्वीही धामोरी, शिंगवे येथील असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या फसव्या धोरणाला कंटाळून बिपीनदादा कोल्हे,स्नेहलताताई कोल्हे आणि विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कोल्हे गटात प्रवेश केला आहे. कोल्हे गटात येण्याचा हा ओघ रोज असाच सुरू आहे.
शनिवारी (30 जुलै) गोधेगाव येथील काळे गटातील अनेक युवा कार्यकर्त्यांनी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.या सर्व कार्यकर्त्यांचे भारतीय जनता पक्षात स्वागत करून बिपीनदादा कोल्हे यांनी सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.भीमराज एकनाथ भोकरे, सागर गोरख भोकरे,गुलाब गणपतराव भोकरे,महेश गोरख भोकरे,भीमराज भाऊसाहेब काटवणे,राहुल नंदू भोकरे, कुणाल विजय पवार,सुजित नंदू भोकरे,गोकुळ नंदू भोकरे,गणपत पाराजी भोकरे,रोहित गोरख भोकरे,राहुल यशवंत चंदनशिव, शरद यशवंत चंदनशिव,राजेंद्र सुखदेव भोकरे,नारायण गीताराम नवले,पुंजाहरी आनंदा भोकरे, शामराव रामदास सोळसे, रामदास भाऊसाहेब काटवणे, साई आबासाहेब भोकरे आदी युवक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
याप्रसंगी माधवराव लहादू रांधवणे,वाल्मिकराव मुरलीधर भोकरे,साईराम तुकाराम कोळसे, जनार्दन काशिनाथ शिंदे,रवींद्र अर्जुन रांधवणे,भाऊसाहेब कारभारी शिरसाठ,अनिल चांगदेव भोकरे,सुभाषराव नारायण कानडे आदी गोधेगाव येथील भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!