Homeकोपरगावअतिवृष्टीग्रस्तांना प्रशासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी - स्नेहलताताई कोल्हे

अतिवृष्टीग्रस्तांना प्रशासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी – स्नेहलताताई कोल्हे

स्नेहलताताई कोल्हे यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून आपद्ग्रस्तांना दिला दिलासा.

संपादक – राजेंद्र तासकर

       सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे कोपरगाव शहरातील व्यापारी आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.प्रशासनाने पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून आपद्ग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी,अशी मागणी भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी तहसीलदार विजय बोरुडे यांची भेट घेऊन केली.
          कोपरगाव शहरात आणि परिसरात काल सोमवारी (८ ऑगस्ट) रात्री चार ते पाच तास मुसळधार पाऊस झाला. या पावसाने अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये तसेच नागरिकांच्या घरांमध्ये पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.माजी आमदार स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी आज शहरातील गुरुद्वारा रोडवरील नेहरू भाजी मार्केट,वाणी कॉम्प्लेक्स व इतर ठिकाणी भेट देऊन पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली आणि आपदग्रस्तांना धीर दिला. 
      सोमवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे कोपरगाव शहरातील गुरुद्वारा रोड,नेहरू भाजी मार्केट आणि इतर भागातील अनेक लहान-मोठे व्यापारी तसेच संजयनगर, सुभाषनगर,आयेशा कॉलनी, बसस्थानकाच्या पाठीमागील परिसरातील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी साचले.शेकडो व्यापाऱ्यांच्या दुकानातील मालाचे आणि नागरिकांच्या घरातील संसारोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसाने बिकट परिस्थिती निर्माण झाली असताना सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष् युवा नेते विवेक कोल्हे यांनी तातडीने संजीवनी उद्योग समूह आणि संजीवनी आपत्ती व्यवस्थापन पथकासह तात्काळ धाव घेऊन नागरिकांच्या घरात आणि व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये शिरलेले पाणी बाहेर काढण्यासाठी मदत करून त्यांना दिलासा दिला.आपत्तीग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या जेवणाची आणि निवाऱ्याची व्यवस्था केली. 
      अतिवृष्टीमुळे कोपरगाव शहरात हाहाकार उडालेला असताना प्रशासन मात्र बेफिकीर होते. अशा वेळी प्रशासकीय यंत्रणेने सतर्क राहून संकटात सापडलेल्या लोकांना तातडीने मदत करणे गरजेचे होते;परंतु तहसील कार्यालय आणि नगर परिषदेची प्रशासकीय यंत्रणा सतर्क नव्हती. प्रशासनाला अजिबात गांभीर्य नव्हते.एवढेच नाही तर एकाही अधिकाऱ्याने नागरिकांचे भ्रमणध्वनी उचलण्याची साधी तसदीही घेतली नाही.मदत करणे तर दूर.ही बाब अत्यंत गंभीर आहे.यापूर्वी कोपरगावात अशी नैसर्गिक परिस्थिती ज्यावेळी उद्भवली त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्याकडून आपदग्रस्तांना तातडीने मदत मिळवून दिली. गोकुळनगरी भागातील नाल्यावर पूल बांधण्यासाठी निधी मंजूर करवून घेऊन पुलाचे काम पूर्ण केले,असे स्नेहलताताई कोल्हे यांनी सांगितले,आता तरी प्रशासनाने सतर्क राहून योग्य ती खबरदारी घ्यावी.नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची त्वरित बैठक घेऊन पावसाने ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना ताबडतोब मदत करावी, अशी मागणी स्नेहलताताई कोल्हे यांनी केली.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!