
संपादक – राजेंद्र तासकर
दि कोपरगाव पीपल्स को. ऑपरेटिव्ह बँकेचे जेष्ठ संचालक कैलास शेठ ठोळे यांच्या हस्ते माजी. नगराध्यक्ष मंगेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
दि कोपरगाव पीपल्स को. ऑपरेटिव्ह बँकेचे माजी संचालक यांच्यावतीने माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी त्यांच्या नगराध्यक्ष, गटनेता,नगरसेवक या कार्यकाळात केलेल्या शहर विकासासाठी केलेल्या कामाबद्दल त्यांचबरोबर कोपरगाव शहरासाठी स्वच्छ व पिण्यायोग्य पाणी मिळावे यासाठी येसगाव येथील ५ नंबर तळ्याचे काम व्हावे यासाठी केलेले आंदोलन व त्याचबरोबर ते करत असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन माजी. नगराध्यक्ष मंगेश पाटील यांना सकाळ उद्योग समूहाच्या तर्फे " सकाळ महाराष्ट्र आयोडॉल "पुरस्कराने सन्मानीत केले. त्याबद्दल रविवार दिनांक ११/९/२२ रोजी बँकेच्या ७४ व्या सर्वसाधारण सभे मध्ये जेष्ठ संचालक कैलासशेठ ठोळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी बँकेचे चेअरमन सत्यनशेठ मुंदडा,सर्व संचालक,जनरल मॅनेजर एकबोटे साहेब,छाजेड साहेब सर्व स्टाफ,कर्मचारी,सभासद आदि उपस्थित होते.