
संपादक – राजेंद्र तासकर
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्य आणि कर्तृत्वाचा गौरव करत रशिया येथील मास्को शहरातील जगप्रसिद्ध लायब्ररी रोडोमिनो मार्गारिटा फोरेन लांग्वेज स्टडी फॉर फोरेन लिटरेचर येथील प्रांगणात आज १४ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण संपन्न झाले आहे. त्यासोबतच रशियातील भारतीय दूतावासात सायंकाळीसाहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या तैलचित्राचे अनावरणही भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ.विनय सहस्त्रबुद्धे यांच्या शुभहस्ते झाले आहे.या समारंभास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री स्वामीजी, विधानसभेचे सभापती अँड.राहुल नार्वेकर,मुंबई विद्यापीठातील रशियन भाषा विभागाचे प्रमुख व युरोशियन अभ्यास केंद्राचे संचालक प्रा.डॉ.संजय देशपांडे, मातंग ग्रुप डेव्हलपमेंटचे सुनील जी वारे,मुंबई विद्यापीठातील साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राचे प्रमुख प्राचार्य डॉ.बळीराम गायकवाड आद़ींची प्रमुख उपस्थिती होती..
रशिया सारख्या प्रगतशील देशात साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा सन्मान झाला असून सातासमुद्रापार अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव होत आहे त्यामुळे भारत सरकारने अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान बहाल करावा महाराष्ट्र शासनाने याची दखल घेत मुंबई विद्यापीठाला साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे नाव देऊन त्यांचा गौरव करण्याचे व मुंबई चिराग नगर येथील अण्णा भाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक लवकरात लवकर उभे करावे आवाहन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी केले
अण्णा भाऊ साठे यांचा मास्को रशिया येथे पुतळा अनावरण समारंभ आणि तैलचित्राच्या प्रकाशनानिमित्त कोपरगाव शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर फटाके वाजवून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी निसार भाई शेख, अँड.सोनल पोळ,विशाल गायकवाड आदींनी या आनंदोत्सव कार्यक्रमात सहभाग घेतला.