Homeकोपरगावसमता पतसंस्थेच्या वतीने राज्यात प्रथमच विशेष उपक्रम,मंदिरांत दिसणार आता ‘डिजिटल दानपेटी’

समता पतसंस्थेच्या वतीने राज्यात प्रथमच विशेष उपक्रम,मंदिरांत दिसणार आता ‘डिजिटल दानपेटी’

समता पतसंस्थेतर्फे कोपरगावातील निवारा परिसरात असलेल्या महादेव मंदिरात शनिवारी डिजिटल दानपेटीचा लोकार्पण सोहळा पार पडला.याप्रसंगी उपस्थित मान्यवर.

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

 कोपरगावातील समता पतसंस्थेच्या वतीने राज्यात प्रथमच विशेष उपक्रम

कोपरगाव : सर्व देवस्थानांच्या परिसरात आपल्याला विशिष्ट धातूची किंवा लाकडाची दानपेटी पाहायची सवय आहे.आता मात्र तिथे डिजिटल दानपेटी दिसली,तर आश्चर्य वाटायला नको;कारण अशा प्रकारची राज्यातील पहिली डिजिटल दानपेटी नगर जिल्ह्यातील कोपरगावात बसविण्यात आली आहे.
तंत्रज्ञानात नेहमीच अग्रेंसर असलेल्या कोपरगाव शहरातील समता पतसंस्थेने यासाठी पुढाकार घेतला आहे.तेथील निवारा परिसरात असलेल्या महादेव मंदिरात या डिजिटल दानपेटीचा लोकार्पण सोहळा शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला.महादेव मंदिर कमिटीच्या वतीने कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे, निवारा भजनी मंडळाचे प्रमुख बाबासाहेब कापे,माऊली गायकवाड, वाकचौरे महाराज यांनी ही डिजिटल दानपेटी स्वीकारली.
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल अधिक माहिती देताना निवारा परिसराचे माजी नगरसेवक जनार्दन कदम म्हणाले,‘डिजिटल दानपेटी देऊन समता नागरी सहकारी पतसंस्थेने डिजिटल क्रांतीत बाजी मारली आहे.या दानपेटीमुळेमंदिरातील दानपेटी चोरीस जाण्याचे प्रकार आता यापुढे घडणार नाहीत;तसेच पूर्वी वापरात असलेली दानपेटी उघडल्यानंतर सुट्टे पैसे मोजण्या साठीचा होणारा त्रास देखील होणार नाही.शिवाय भाविकांनी केलेले सर्व दान महादेव मंदिर कमिटीच्या नावाने समता पतसंस्थेतअसलेल्या बचत खात्यात रोज जमा होईल.या रकमेवर ७ टक्के व्याजही मिळेल.
समता पतसंस्थेचे सहायक सरव्यवस्थापक संतोष मुदबखे यांनी या डिजिटल दानपेटीविषयी विस्तृत माहिती दिली.ते म्हणाले,‘समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात समता नागरी सहकारी पतसंस्था अग्रेसर असून,समताने आधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबतीत जागतिक पातळीवर देखील कीर्ती मिळविली आहे.जागतिक पातळीवरील डिजिटल दानपेटीचा हा पहिलाच प्रयोग आहे.या दानपेटीच्या अनुषंगाने सर्व भाविकांचे डिजिटल दानही सुरक्षित होईल.
याप्रसंगी निवारा भजनी मंडळाचे हौशीराम बर्गे,दिलीप संगमनेरे,प्रवीण कोल्हे,विजय कांगुने,जोशी गुरू,तसेच निवारा महिला भजनी मंडळाच्या महिला,निवारा परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!