

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
उत्तर -दक्षिण वाहिनी असलेल्या व उत्तर काशी गंगा म्हणुन संबोधलेल्या गोदावरी नदीच्या पश्चिम तीरावर वसलेल्या कुंभारी नगरीचे ग्रामदैवत राघवेश्वर देवस्थान ;येथील मठाधिपती श्री श्री १०८ महंत राघवेश्वरानंदगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली साई राघवेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने राघवेश्वर मंदिरात १५०० पणत्या पेटवून महाआरतीसह दीपोत्सव साजरा केला असल्याची माहीती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत घुले यांनी दिली.
दिपावली म्हटलं की सर्वांसाठी एक नवचैतन्याची घडी,एक महिना आगोदर गृहिणींची लगबग चालू होते,अनेक संकल्पना डोळ्यासमोर ठेवून त्या दिशेने त्यांची वाटचाल सुरु असते,अशीच संकल्पना साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत घुले यांना सूचली आणि त्यांनी ती आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने दिपावलीच्या दिवशी दिप प्रज्वलन करून प्रत्यक्षात साकारली.
या आनंद उत्सवात साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत घुले,उपाध्यक्ष वात्मिक निलकंठ व सर्व सदस्य,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवाजीराव घुले,कुंभारी ग्रामपंचायत सदस्य ललित निलकंठ,वसंत घुले ग्रामस्थअशोकराव निलकंठ,सोमनाथ निलकंठ,एस.डी.जाधव इंग्लिश मिडियम स्कूलचे मुख्याध्यपक अतुल निलंकठ,राजेंद्र निलकंठ,दिलिप ठाणगे,अमोल ठाणगे,संदिप निलकंठ,संतोष कदम,नितिन घुले,अभिजित चकोर, सेवेकरी बापू चव्हाण,भाऊसाहेब पवार,लक्ष्मण साबळे,भाऊराव बर्डे,मिराबाई पवार व महिला मंडळ,तरूण मंडळ तसेच ग्रामस्थांनी सहपत्नी मोठया संख्येने उपस्थित राहुन महाआरतीचा व दर्शनाचा लाभ घेतला.
