Homeसंपादकीय५० आमदारांना खरचं ‘खोके’ दिले का? हे आता शिंदे - फडणवीसांनीच स्पष्ट...

५० आमदारांना खरचं ‘खोके’ दिले का? हे आता शिंदे – फडणवीसांनीच स्पष्ट करावे;आमदार बच्चू कडूंचा संतप्त सवाल

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

  महाराष्ट्राच्या विकासाची खुंटलेली गती वाढवण्यासाठी आणि जनादेशाचा आदर करुन राज्यातील ५० आमदारांनी स्वतःहून एकनाथ शिदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. अनेकांनी तर मंत्री असूनही त्याचा त्याग केला आणि शिंदेना समर्थन दिले.त्यावेळेपासून ठाकरे गटाकडून या ५० आमदारांवर खोके घेतल्याचे आरोप होत आहेत.विरोधक म्हणून आणि सत्तेवरुन पायउतार व्हावं लागल्यामुळे त्यांचे आरोप आम्ही समजू शकतो.त्याला जनताही फारशी गांभीर्याने घेत नाही.मात्र आता कधी आघाडीच्या तर कधी भाजपच्या आडोशाला राहून दलाली आणि स्टंटबाजी करणा-या आमदार रवी राणा यांच्याकडूनच खोक्यांचे आरोप माझ्यावर झाले आहेत.सत्तेवर लाथ मारणारा माझ्या सारख्या स्वाभिमानी माणूस असले आरोप सहन करणार नाही.त्यामुळे मी राणा यांच्यावर पोलिसात गुन्ही दाखल केला आहे. आरोप सिद्ध करावेत नाहीतर माफी मागवी,त्यांना जशाच तसे उत्तर देऊ असा जोरदार पलटवार बच्चू कडून यांनी केला आहे.
  रवी राणा यांच्यामुळे केवळ मीच नाही तर सबंध ५० आमदार नाराज झाले आहेत.अनेकांनी मला फोन करुन याबाबत त्यांची भूमिका मांडली. राणा यांचे आरोप हे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही शिंतोडे उडवणारे आहेत.रवी राणा हे देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांचे जवळचे आहोत असं सांगत असतात. त्यामुळे त्यांचा आऱोपांमागे कुणाची फूस तर नाही ना अशी शंका येऊ लागली आहे.त्यामुळे आता वेळ आली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर या आरोपांबाबत स्पष्टीकरण देण्याची आणि स्टंटबाज आणि दलाल रवी राणा यांना समज देण्याची.
                     माझे आजपर्य़ंतचे राजकारण हे कायम संघर्षाचे राहिले आहे.सत्ताधा-यांविरोधात राहिले आहे. मला सत्तेचा मोह कधीच नव्हता आणि नाही.मंत्रीपद मिळो अथवा न मिळो. असले खोटे आरोप मी कधीही सहन करणार नाही.अत्यंत गरिबीतून आणि काबाड कष्ट करुन मी माझ्या जनतेच्या पाठिंब्याच्या जोरावर चार वेळा आमदार झालो आहे.जनतेनं दिलेल्या या पुण्याईवर जर कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रय़त्न केला तर ते सहन केलं जाणार नाही.त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवंद्र फडणवीस यांना विनंती आहे. की त्यांनी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट करवी.जेणेकरून हे आरोपांचे मभळ दूर होईल.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे.ते मला योग्य तो न्याय देतील अशी अपेक्षा आहे.

आपला….
बच्चू कडू,

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!