
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने आज एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
आज सोमवार दि ३१/१०/२०२२ रोजी कोपरगाव तहसिल कार्यालया समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले व खालील मागण्यांचे निवेदन कोपरगाव येथील नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांना देण्यात आले.
शंभर टक्के पीक विमा मिळावा,शेतीचे नुकसान झाले असून त्याची नुकसान भरपाई मिळावी,शेतीच्या नुकसानीमुळे मजुरांना काम नाही त्यामुळे मजुरांना आर्थिक मदत मिळावी,मागील पिका करिता घेतलेले कर्ज माफ व्हावे,रब्बीच्या पिकासाठी कर्ज उपलब्ध करून घ्यावे,पुन्हा अतिवृष्टी मुळे शेतीचे नुकसान होऊ नये म्हणून सर्व गावातील ओढे,नाले व रस्त्याच्या साईड गटारची अतिक्रमणे काढून खोलीकरण व रुंदीकरण कामे व्हावी अशी मागणी करण्यात आली असून,यावेळी आर पी आय गवई गटाचे अशोक शिंदे,मनसे चे संतोष गंगवाल,निलेश काकडे,अनिल गाडे,शिव सेना संपर्क प्रमुख प्रवीण शिंदे,पंचायत समितीचे माजी सभापती सुनील देवकर,तुषार विध्वंस,अमन भाई मणियार,भारत रोकडे,लक्ष्मण सताळे,राजेश हाबडे,अशोक घोलप,कृष्णा राक्षे,राजन त्रिभुवन, योगेश शेलार,किशोर शेलार,दिनेश जमधडे आदी उपस्थित होते.
