Homeकोपरगाव"परिमळ भक्तीचा " काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकांतदादा वानखेडे यांच्या हस्ते...

“परिमळ भक्तीचा ” काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकांतदादा वानखेडे यांच्या हस्ते मोठया उत्साहात संपन्न

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

      कोपरगाव येथे सौ.चंदन सुशिल तरवडे,ढुमणे लिखित काषाय प्रकाशनाचे"परिमळ भक्तीचा"काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक प्रा.चंद्रकांतदादा वानखेडे यांच्या हस्ते रविवार दि.२२ जानेवारी २०२३रोजी मोठया उत्साहात संपन्न झाले.  कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिका अलका येवले (नाशिक),कोपरगावचे श्रीम.विद्युलता आढाव(राष्ट्रीय अध्यक्षा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महिला आघाडी),केंद्रप्रमुख मा.राजेंद्र ढेपले साहेब,केंद्रप्रमुख श्रीम.भोईर मॅडम नाशिक कोष्टी समाज कला मंचाचे सचिव श्री.ज्ञानेश्वर खराडे तसेच कोकमठाणच्या मुख्याध्यापिका श्रीम.निर्मला जाधव मॅडम उपस्थित होत्या.सौ.चंदन तरवडे लिखित दुसऱ्या काव्यसंग्रहाचा अतिशय उत्कृष्ट सोहळा पार पडला.श्री.सुशिल हरिचंद्र तरवडे यांनी अतिशय उत्कृष्ट नियोजन केले होते अनेक मान्यवरांनी चंदन ताईंचे भरभरून कौतुक केले त्यांच्या काव्यसंग्रहाला भरभरून शुभेच्छा दिल्या.

चंद्रकांत दादांच्या गोडवाणीचा सर्वांनी मनमुराद आनंद घेतला.प्रा.चंद्रकांत दादांच्या परिसस्पर्शाने कार्यक्रमाला एक अनोखे स्वरूप प्राप्त झाले.इतर सर्व मान्यवरांनी काव्यसंग्रहाला भरभरून शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचालन कवयित्री प्रतिमा काळे व सौ.राजश्री वाणी मराठे यांनी अतिशय सुंदर केले.चंदन ताईंच्या अभंगाचे उत्कृष्ट गायन राजश्री वाणी व सुनिता कपाळे यांनी केले.
चि.आकाश तरवडे यांनी प्रास्ताविक अतिशय सुंदर करून सर्वांची मने जिंकून घेतली .
अतिशय उत्साहात प्रकाशन सोहळा संपन्न झाला.तसेच सोहळ्या सोबतच कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते त्याचे कविसंमेलनाध्यक्ष गुजरातचे सुप्रसिद्ध कवी शिवानुज उर्फ नितिन वायाळ उपस्थित होते. तसेच सुप्रसिद्ध गीतकार कवी माननीय गुलाब राजा फुलमाळी तसेच माऊली प्रतिष्ठान नाते शब्दांचे साहित्य मंचाचे संस्थापक अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर शिंदे तसेच उपाध्यक्ष बाळासाहेब देवकर कार्याध्यक्ष श्रीम.आरती कोरडकर व श्री.पंडीत निंबाळकर तसेच जिल्हा परिषद शाळेतील अनेक शिक्षक उपस्थित होते.तसेच महाराष्ट्रातील अनेक मान्यवर कवी कवयित्री उपस्थित होते कवी श्री.रविंद्र देशमुख (मुंबई),कवी डॉ.सुनिल पवार (बुलढाणा),कवयित्री सौ.सुनिता कपाळे (औरंगाबाद),कवी डॉ.सुशिल सातपुते ,कवी श्री.विजय जाधव (शिक्रापूर),कवयित्री सौ सरिता कलढोणे (जुन्नर),कवी श्री.विनोद सावंत (पलूस),कवी श्री.आकाश जाधव, कवयित्री. सीमा राणी बागूल,आनंद घायवट (कसारा)
अतिशय थाटामाटात काव्य संमेलन सोहळा पार पडला.सर्व स्तरावरून ताईंचे कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!