Homeकोपरगावजनतेच्या समस्या सुटे पर्यंत स्वस्थ बसणार नाही - युवानेते विवेकभैय्या कोल्हे

जनतेच्या समस्या सुटे पर्यंत स्वस्थ बसणार नाही – युवानेते विवेकभैय्या कोल्हे

महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणारी समस्या निवारण भेट कोपरगाव तहसील येथे पडली पार

.

कारवाडी परिसरातील जिल्हापरिषद अंतर्गत तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्त्याचे काम थातुरमातुर करून ग्रामपंचायतीने मंजुर अंदाजपत्रक मागणी केली तर त्याला केराची टोपली दाखली जाते, ठेकेदारांच्या भलावणीसाठी जनतेला वेठीस धरू नका,जनतेचा संतापाचा कडेलोट होत आहे,पंचायत समितीत ठरावीक गटाचीच विकास कामे होत आहेत.माहेगाव देशमुख गायगोठ्यांचे प्रकरणे जाणुनबुजुन पूर्ण केली जात नाही असेही विवेक भैय्या कोल्हे शेवटी म्हणाले.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील रस्त्यांच्या कामाबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभागाची स्वतंत्र बैठक घेऊन आढावा घेतला जाईल असेही ते म्हणाले.

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या विकासनिधीतील सामाजिक सभागृहासह अपूर्ण कामांचा गेल्या साडेतीन वर्षापासून आपण पाठपुरावा करतो आहोत मात्र अधिकारी थातुर मातुर तीच तीच उत्तरे देऊन मन समाधान करतात मात्र जनतेचा संयम सुटला अन त्यात काही बरे वाईट झाले तर आम्ही जबाबदार राहणार नाही असा निर्वाणीचा इशारा जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी दिला. 
    दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी कोपरगाव शहर व विधानसभा मतदार संघातील प्रलंबीत सार्वजनिक प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी विवेकभैय्या कोल्हे तहसीलच्या दालनात समस्या निवारण जनता दरबार घेतात त्यात ते सोमवारी बोलत होते.
       तहसिलदार विजय बोरुडे, नायब तहसिलदार पी.डी.पवार, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बाळासाहेब साबळे,सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे गाडे,वीज वितरण कंपनी,नगरपालिका आदि प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर विवेक भैय्या कोल्हे यांनी मागील बैठकीत ठरलेल्या व झालेल्या कामांचा आढावा घेतला.या जनता दरबारात कोपरगाव मतदार संघातील प्रलंबीत कामांच्या निवेदनांचा व व्यक्तीगत कामचा पाऊस पडला.
            श्री.विवेक भैय्या कोल्हे पुढे म्हणाले की,जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रश्नांचे गांभीर्य नाही. ग्रामीण भागातील खेडयापाडयातील नागरीक छोटया छोटया कामासाठी पदरमोड खर्च करून तालुक्याच्या ठिकाणी येतात पण अधिकारी - पदाधिकारी त्यांना भेटत नाही अशावेळी सर्वसामान्य जनता आमचेकडे तक्रारी घेऊन येतात, समस्या सुटत नसल्याने ते जर्रर्जर होऊन अपशब्द काढतात पण आपण प्रत्येकवेळी संयम दाखवतो म्हणजे त्याचा काही अर्थ अधिकाऱ्यांनी काढू नये,नागरीक - जनता सयम ठेऊन आहे पण त्यांचा संयम सुटला तर त्यातून भलते सलते घडु शकते तेंव्हा जबाबदार अधिकाऱ्यांनी सार्वजनिक सह व्यक्तीगत प्रश्नांची तातडीने सोडवणुक करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा.
        राज्यात व जिल्हयात आपलेच शासन आहे.पालकमंत्री देखील याच जिल्हयातील आहेत,महसुल स्तरावर प्रश्न सुटत नसतील तर मगआम्ही काय समजावे.शेजारच्या मतदारसंघात दुबार,विभक्त नवीन रेशनकार्ड धारकांना स्वस्त धान्य मिळते येथे मात्र दोन- दोन वर्षे वाट पहावी लागत आहे; हे बरोबर नाही.भले संबंधीत अधिकाऱ्यांनी तंत्रज्ञानाची मर्यादा वाढवुन माझे मायबाप शुल्लक कारणासाठी वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी.
     नागपुर मुंबई समृद्धी महामार्गाचे कामामुळे खराब रस्त्यांची व चाऱ्या पोटचाऱ्या क्रॉसींगची कामे तात्काळ सुरू करावी,शिंगणापूर रस्त्याचे अतिक्रमण काढावे,हनुमानवाडी ते भोजडे रस्ता त्वरीत सुरळीत करावा, घारी गावाला पुर्वीच्या स्वस्त धान्य पुरवरादाराकडून वेळेत शिधा मिळत होता आता त्यात हलगर्जीपणा होतो आहे,धारणगाव येथे गेल्या वर्षभरा पासून स्वस्तधान्य दुकान तात्पुरत्या स्वरुपात आहे ते कायमस्वरूपी  करावे,माहेगांव देशमुख येथे सर्व्हर उपलब्ध होत नसल्याने स्वस्त धान्य माल घेणाऱ्यांना ताटकळत बसावे लागते,घारी व डाऊच बुद्रुकसाठी स्वतंत्र सजा करावी,गोधेगांव कोकमठान सह अन्य गावात गावंशिवार बरोबरच रस्त्यांचे असंख्य प्रश्न प्रलंबीत आहे ते मागी लावावे, 2020 मध्ये झालेल्या अतिवृष्टीचे अनुदान अजुनही शेतकऱ्यांना  मिळालेले नाही त्याचे त्वरीत वाटप करावे,झगडे फाटा ते रांजणगांव देशमुख रस्त्याची चाळणी झाली आहे.हा रस्ता वाहतुकीस योग्य नाही, त्याचे खडडे बुजविण्यापेक्षा मजबुती करणाचे काम हाती घ्यावे,2022 मधील अतिवृष्टीचे अनुदान त्वरीत मिळावे.
            याप्रसंगी शरदनाना थोरात, तालुकाधयक्ष साहेबराव रोहोम,सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक रमेश आभाळे,ज्ञानदेव औताडे,बाळासाहेब पानगव्हाणे,शिवाजी कदम,प्रदीप नवले,भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम,सरपंच रविंद्र आगवण,भिमा संवत्सरकर, चंद्रभान रोहोम,एल.डी.पानगव्हाणे,कैलास राहने,गणेश आभाळे,निखिल औताडे,नवनाथ औताडे,गोरक्षनाथ कोकाटे, संतोष सरडे,दिगंबर कोकाटे,शंकरराव फटांगरे,शांताराम मेहरखाब,दीपक हुडे,शरदराव गडाख,संपत ढोमसे,दादा कासार,राहुल गाडे,मोतीराम मोकळ,संतोष सोनवणे,रणजीत भगत,प्रशांत वाबळे,राजेंद्र वैराळ,सतीश बोरावके,रमेश खैरनार,रावसाहेब मोकळ,बाळासाहेब चांदगुडे,हेमंत निकम, रेवणशेठ निकम,रवींद्र निकम,प्रकाश भाकरे,कचेश्वर आहेर, बाबासाहेब फटांगरे,संजय त्रिभुवन,सतीश केकान,प्रभाकर शिंदे, प्रकाश दवंगे,प्रसाद आढाव,पोपटराव निळकंठ,वारूबा रोकडे, सुनील कदम,किसन पवार,संदीप गुरुळे,विष्णुपंत क्षीरसागर, गोरख टूपके,शाम संवत्सरकर,अरविंद संवत्सरकर आदिंसह भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक,विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी,सरपंच, उपसरपंच,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते.शेवटी भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी आभार मानले.



         सार्वजनिक बांधकम व वीज विभागाचे प्रश्न मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिकांना मनस्ताप होऊ देऊ नका अन्यथा आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावी लागेल असा आक्रमक पवित्रा युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांचा पाहून ज्येष्ठ नागरिकांमध्ये माजी  मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या कार्यशैलीची आठवण झाल्याची चर्चा या बैठकीत घडलेला प्रसंग पाहून झाली.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!