Homeकोपरगावमाजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे साहेब : एक परिस स्पर्श…श्री. बाजीराव जी.सुतार,मॅनेजिंग डायरेक्टर,स.म.शं.को.स.सा.का.लि.,...

माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे साहेब : एक परिस स्पर्श…श्री. बाजीराव जी.सुतार,मॅनेजिंग डायरेक्टर,स.म.शं.को.स.सा.का.लि., सहजानंदनगर

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

            सहकारातील अध्वर्यु,आपणा सर्वांचे दैवत, संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष,महाराष्ट्र राज्याचे माजी हंगामी सभापती,कॅबिनेट मंत्री,सहकार,महसूल,कृषी व फलोत्पादन,राज्य उत्पादन शुल्क,कमाल जमिन धारणा व परिवहन मंत्री आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेब यांचा सहवास मला लाभला,हे मी माझे भाग्य समजतो.सहकार महर्षी शंकरराव कोल्हे स.सा.का.लि.सहजानंदनगर या कारखान्यात पहिल्याच दिवशी मी हजर होतांना मा.संचालक मंडळाचे मिटींगमध्ये माननीय साहेबांची व माझी पहिलीच भेट झाली.त्यांना जवळून बघण्याचा योग पहिल्यांदाच आला.वयाच्या ९२व्या वर्षीही साहेबांच्या चेहऱ्यावरील तेज,मिटींगमधील विषयांकडे साहेबांची बारकाईने लक्ष देण्याची तळमळ आणि त्या त्या विषयाशी निगडीत असणाऱ्याटिपणीचे पुर्णपणे वाचन,साहेब स्वतःकरीत असल्याचे पाहून मला प्रथमदर्शनी आश्चर्य वाटले.या वयातही अत्यंत सखोलपणे व बारकाईने लक्ष देण्याची त्यांची जिज्ञासा पाहून मी भारावून गेलो.दैनंदिन कामकाजात काम करीत असतांना दररोज सकाळी फॅक्टरी मधील त्यांचा सर्व विभागात राऊंड असो,किंवा शुगर हाऊसमध्ये चालत असतांना त्या ठिकाणी साखरपडल्याचे दिसल्यास त्याचे बारकाईने निरिक्षण करून त्याच ठिकाणी जाब विचारण्याची पध्दत असो,या सर्व गोष्टी साहेबांचे एक कुशल प्रशासक व एक कुशल निरीक्षक याचे द्योतकच ते दाखवून देत होते.आदरणीय साहेबांचा मला फार कमी कालावधीचा सहवास जरी मला लाभला असला,तरी तो कालावधी बरेच काही शिकवून गेला.फॅक्टरीच्या आतमध्ये राऊंडच्या वेळी इंजिनिअरींगच्या ऑफीसमध्ये या वयातही ते संपूर्ण मशिनरीची माहिती घेत असे.तसेच साखर कारखान्याची मशिनरी ही अद्ययावत असली पाहिजे,हा त्यांचा नेहमीच ध्यास होता.एकवेळ त्यांनी रिकव्हरीच्या बाबतीमध्ये मला प्रश्न केला की,रिकव्हरी ही कशी मिळाली पाहिजे?मी त्यांना सांगितले की,साखर कारखान्याची मशिनरी ही अद्ययावत असलीच पाहिजे,त्याचबरोबर साखरेची रिकव्हरी ही जर आपल्याला जास्त मिळवायची असेल तर साखरेच्या रिकव्हरीची निर्मिती ही शेतात होत असते.यावर ते हसले व मला म्हणाले,अगदी बरोबर आहे.ऊस उत्पादन व रिकव्हरी चांगल्या ऊसाच्या जातीवर अवलंबून आहे.त्यासाठी सर्वच घटकांनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजे.एका रविवारी साहेबांना उद्योजकता परिषदेच्यावतीने कोपरगांव येथे'जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्काराचा कार्यक्रम होता.तो कार्यक्रम संपवून ते सायंकाळी ४.३० ते ५.०० वाजणेचे आसपास थेट कारखान्याच्या शुगर हाऊसमध्ये आले व त्यावेळी आम्ही सर्वजण फॅक्टरीमध्येच होतो.आदरणीय साहेब शुगर हाऊसमध्ये उतरल्यानंतर ते मला म्हणाले,आज सुट्टी आहे.मी म्हणालो,आम्ही सर्वजण सिझन चालू असतांना सुट्टी घेत नाही.त्यावर ते हसले व परत आम्ही इंजिनिअरींग विभागाच्या ऑफीसमध्ये जाऊन बसल्यानंतर थोडावेळ चर्चा केली व गाडीमधून जातांना त्यांनी माझ्या हातात हात दिला याचे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले की,साहेब सहसा कोणाच्या हातात हात देत नाहीत,हाच परिस स्पर्श (Exchange of Mangnet) मला बराच काही जाणवून गेला.यालाच म्हणतात,आपल्यातील उर्जा इतरांना देणे. आदरणीय साहेब नंतर अचानक आजारी पडल्याने त्यांना नाशिक येथील दवाखान्यांत अॅडमिट करण्यात आले होते.त्याच कालावधी मध्ये कारखाना कार्यस्थळावर"श्री गुरूचरित्र पारायण" सप्ताह प्रतिवर्षा प्रमाणे चालू होता.'अध्यात्म व विज्ञान'याची कायम कास धरून चालणारे साहेब दवाखान्यातून बरे होऊन आल्यानंतर सदर गुरू चरित्र पारायण कार्यक्रमास भेट देऊन गेले.
   सन २०२२च्या महाशिवरात्रीदिनी आम्हाला कारखाना सुरू असल्याने कुठेही जाता आले नाही.त्या दिवशी सकाळी साहेब स्वत:फॅक्टरीमध्ये राऊंडला आले होते.आम्हा सर्वांची साहेबांची भेट झाली.त्यावेळी मी सर्वांना म्हणालो,"प्रत्यक्ष देवच आपल्या भेटीला आले."कारण साहेबांच्या नावातच'शंकर' होते.
    आदरणीय साहेब,मा.बिपीनदादा कोल्हे साहेब,अध्यक्ष संजीवनी उद्योग समूह व आता नवनिर्वाचित अध्यक्ष मा.श्री. विवेकभैय्या कोल्हे साहेब अशा तीन पिढींशी कार्य करण्याचा मला लाभलेला योग हा एक त्रिवेणी संगमच म्हणावा लागेल. स्व.कोल्हे साहेबांचे पश्चात एक आधारवड म्हणून आदरणीय माई या आपणां सर्वांनाच प्रेरणादायी ठरल्या आहेत.त्यांचेशी ज्या ज्या वेळी बोलणे होते त्या त्या वेळी आदरणीय माई साहेब या सुध्दा तितक्याच प्रगल्भ विचारसरणीच्या आहेत.त्या नेहमीच म्हणतात,माझे वडिलांनी मला संपूर्ण देश दाखविला आणि कोल्हे साहेबांनी मला संपूर्ण जग दाखविले.तसेच त्यांचे बोलणे हे नेहमी ऐकतच राहवेसे वाटे.एकेक वाक्यांमध्ये परिपूर्ण अभ्यास,अधून मधून इंग्रजी शब्द त्या बोलत असतात.हे त्यांचे बोलणे,अनुभवाचे बोल,तासन्तास ऐकतच रहावेसे वाटते, त्यामुळे त्यांचे भेटीतील वेळ कधी निघून गेला हे उमजतच नाही.त्याचबरोबर कोपरगांव तालुक्याच्या प्रथम महिला आमदार मा.सौ.स्नेहलताताई कोल्हे(वहिनीसाहेब) यांचे ही वेळोवेळी मार्गदर्शन लाभते व ही सर्व कुटुंबीय आदरणीय साहेबांचे मार्गदर्शनातून सहविचारांतून तयार झालेली आहेत.कोपरगांव तालुक्यांत,नगर जिल्ह्यामध्ये व महाराष्ट्र राज्यांत अनेक कार्यकर्ते व अधिकारी यांचे त्यांच्या परिसस्पर्शाने त्यांचे जिवनाचे सोने झाले.साहेबांनी अनेक सहकारी संस्था उभारल्या त्यामध्ये प्रमुखाने वसंतदादा शुगर इन्स्टीट्युट,नॅशनल हेवी इंजिनियरिंग पुणे,महाराष्ट्र राज्य साखर संघ व देशपातळीवरील नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरीज लि.इंडियन शुगर एक्सपोर्ट / इम्पोर्ट कॉर्पोरेशन नवी दिल्ली इ.सहकारी संस्थेत साहेबांनी केलेले कार्य हे अविरतपणे आपणांस प्रेरणादायीच ठरेल.एक उत्तम राजकारणी,अभ्यासू नेतृत्व,महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये युवकांना संधी देणारे एक आदर्श नेते,राज्याचे मार्गदर्शक,त्यांचे करारी बाण्याने अखंडपणे व अविरतपणे 'एक संघर्ष योध्दा'म्हणून लढत राहण्याची प्रवृती ही प्रेरणादायीच सर्वांना ठरेल.आदरणीय कोल्हे साहेबांनी अखेरच्या श्वासापर्यंत मृत्युशी झुंज दिली व अखेर वयाच्या ९३ व्या वर्षी १६ मार्च २०२२ रोजी साहेब आपल्यातून अनंतात विलीन झाले. 
       ५ मार्चला तिथीप्रमाणे पहिले वर्षश्राध्द (पुण्यस्मरण) आहे.आदरणीय साहेबांनी घालून दिलेले आदर्शवत नियम,ध्येय-धोरणे,तसेच गोरगरिबांचे आधारवड व शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास हेच त्यांच्या जीवनाचे अंतिम ध्येय होते,हे ज्यांनी जपले अशा या थोर,महान विभूतीस माझ्या वतीने विनम्र अभिवादन ।

श्री.बाजीराव जी.सुतार,मॅनेजिंग डायरेक्टर,स.म.शं.को.स.सा.का.लि., सहजानंदनगर.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!