

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
हिरकणी महाराष्ट्राची एकल महिलांची राज्यातील तसेंच देशातील पहिला फॅशन शो डॉ अशोक गावित्रे यांच्या डॉ ए जी फिल्म प्रोडकशन,स्टारडम इंडिया,तसेंच सावित्रीबाई ज्ञानदीप प्रतिष्ठानआयोजित महिला दिनानिमित्त एकल महिलांच्या प्रतिभेचं दर्शन घडवणारा फॅशन शो कार्यक्रम कोपरगाव येथे संपन्न झाला.
कोविड काळात साधारण 85000 स्रियांच्या पतीचे निधन झाले,पती निधनानंतर त्यांच्यावर बिकट परिस्थिती ओढवली गेली,आजही विधवा स्रियांना संविधानाने दिलेले अधिकार नाकारले जात आहे त्यांना हीन वागणूक देण्यात येते, त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्यवर गदा आणली जाते;कुंकू लावणे,जोडवे घालणे,बांगडया घालणे यापासून त्यांना रोकले जाते सरकारने विधवा प्रथा बंदीवर अनेक ठराव पास केले परंतु,आजहि त्याची अंमल बजावनी होताना दिसत नाही,या सर्वांतून समाजात जनजागृती व्हावी यासाठी या शो चे आयोजन डॉ अशोक गावित्रे यांनी केले होते.
हि स्पर्धा पुण्या मुंबईमध्ये होणाऱ्या फॅशन शो पेक्षाही अधिक चांगली झाली,यामध्ये 2 राऊंड घेण्यात आले पहिला राऊंड हा ट्रॅडीशनल होता त्यामध्ये त्यांनी जिजाऊ, रमाई,राणी लक्षमीबाई,सावित्रीबाई फुले,ताराराणी यांची वेषभूशा करून त्यांनी दिलेला संदेश देखील सांगितला;दुसरा राऊंड वेस्टर्न प्रकारातील होता यात त्यांनी मॉडर्न प्रकारचा लुक केला होता या बरोबरच त्याचे टॅलेंट देखील तपासण्यात आले त्यासाठी त्यांना विविध प्रश्न उपस्थित जजेस यांनी विचारले. यासाठी महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रुपवते,एकल समितीच्या प्रतिभा कुलकर्णी,संगिताताई मालकर,समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी स्वाती कोयटे यांसह अनेक महिला भगिनी कार्यक्रमास उपस्थित होत्या.
ज्युरी म्हणून मिस ब्राह्मणी ओझा विनर स्टारडम इंडिया युनिव्हर्स स्टार 2022,तसेंच मॉडेल अंजली शर्मा,श्रीकांत शेरताट यांनी महत्वाची भूमिका बजावली तसेच या स्पर्धेसाठी मिस मानसी मिसर व अजय महांकाळ यांनी यांची प्रॅक्टिस करून घेतली तसेच नीलम गावित्रे,हेमंत शेजवळ,रवी जाधव, झुबेर खान,रवी अहिरे,शुभम नन्नावरे,साहिल बागुल,अविनाश पाटील,यांनी देखील यासाठी खूप मेहनत घेतली.
या शो मध्ये विनर या अकोल्याच्या सुरेखा मंडलिक या ठरल्या तर 1st रनरअप या कोपरगावच्या रश्मी शर्मा तर 2nd रनरअप या बारामतीच्या अश्विनी तावरे या ठरल्या त्या सोबतच 10 सब टायटल देखील काढण्यात आले या स्पर्धेत एकूण 78 स्पर्धांकानी सहभाग नोंदविला आहे.
