Homeकोपरगावशब्दाला धार असणारे कर्तबगार पोलीस निरीक्षक मा.श्री.वासुदेव देसले साहेब यांच्या कार्याचा गौरव...

शब्दाला धार असणारे कर्तबगार पोलीस निरीक्षक मा.श्री.वासुदेव देसले साहेब यांच्या कार्याचा गौरव करतांना

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

        कोपरगाव तालुक्याचे गत वैभव पाहता तालुक्यामध्ये अनेक पोलीस निरीक्षक आलेत आणि गेलेत परंतु देसले साहेबांसारखी शब्दाला धार असणारे व शब्दाला जागणारे उच्चशिक्षित,कर्तबगार,डॅशिंग,दबंग आणि सर्वात लोकप्रिय पोलीस निरिक्षक म्हणून तसेच पोलीस खात्यात आपण कर्तव्य बजावत असताना कोपरगाव तालुक्यात जे माणुसकीचे बीज पेरलं ते अतिशय वाखण्याजोगे आहे अशा शब्दात पोलीस निरिक्षक मा.श्री.वासुदेव देसले साहेब यांच्या कार्याचा गौरव माजी.जिल्हा परिषद सदस्य संपतराव भारुड आणि सिने अभिनेते राहुल भारूड यांनी केला आहे.त्यांची बदली कोपरगाव  शहर पोलीस स्टेशनमधून कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला झाल्याबद्दल त्यांचा श्रीफळ,शाल,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
         श्री.भारूड पुढे ते म्हणाले कि,सर्वच घटनांमध्ये आपली बहादुरी आपली कर्तबदारी ही आम्हाला जवळून बघायला मिळाली आहे प्रत्येक केस मध्ये आपला जो सिंहाचा वाटा असायचा आणि हिरारीने आपण त्याचा छडा लावायचे त्यामध्ये अनेक दरोडे असेल वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हेगारी असेल मोटरसायकल चोरीचे प्रकार असेल अपघात असेल आपण रस्त्यावर उतरून अनेकांना न्याय मिळवून दिला,कालचीच गोष्ट आहे आपण कोपरगावमध्ये उपोषण थांबवून त्यांना शब्दाप्रमाणे ताबडतोब मुलीला पकडण्यात यश मिळवले.त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम असो जयंती असो प्रत्येक कार्यक्रमात आपले मार्गदर्शन लाभले आहे,असे कर्तबगार पोलीस निरीक्षक आमच्या तालुक्याला लाभले हे आम्ही आमचे भाग्य समजतो.
    परंतु बदलीची जी बातमी आम्हाला कळाली त्या बातमीने अनेकांचे डोळे भरून आले तुम्हीच सांगा साहेब लेकराप्रमाणे सगळयांवर माया करायची आणि अचानक बदलीची नोटीस दाखवून कोपरगाव तालुक्याला सोडून जायचं,कोपरगाव तालुका हा ऐतिहासिक साधू संतांचा पवित्र असा तालुका आहे अजून शहराला सहवास लाभला असता तर बरं झालं असतं.

आपल्या बदलीच्या बातमीने अनेकांचे मनं खिन्न झाले आहेत साहेब आपण कायम आमच्या आठवणीत असाल आणि आम्ही आपल्या नेहमी संपर्कात राहू आपले प्रेम सदैव असेच ठेवा कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आपले स्वागत आणि हार्दिकअभिनंदन आपणास पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आपल्या हातून अनेक गुन्हेगारांना शिक्षा होऊन सुसंस्कृत असा समाज घडो अशा शब्द सुमनांनी माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव भारुड आणि सिने अभिनेते राहुल भारुड यांनी पोलीस निरिक्षक मा.श्री वासुदेव देसले साहेबांना शुभेच्छा दिल्या.
छायाचित्रकार -हेमचंद्र भवर,कोपरगाव

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!