
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव येथील अंकुर कृषी सेवा केंद्राचे वतीने डाळींब उत्पादकांसाठी शेती तज्ञ डाळिंब रत्न श्री.बी.टि गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
अंकुरचे संचालक अश्विन सुरळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.श्री भास्करराव सुरळे यांनी उपस्थितांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
याप्रसंगी श्री.बी टि गोरे साहेब यांनी डाळिंब फळबाग संगोपन व जतन,उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
श्री स्वप्नील पाटील तसेच श्री प्रगतीशील शेतकरी श्री खंडू पाटील फेपाले यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.